Press "Enter" to skip to content

5 वर्षांची चिमुरडी हर्षिती भोईर जागतिक विक्रमाची मानकरी

सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू) 🔷🔶🔷🔶

उरण तालुक्यातील भेंडखळ गावातील पाच वर्षीय हर्षिती भोईर हिने प्रजासत्ताक दिनी 12 तासात पाच गड चढून जाण्याचा अनोखा विक्रम केला होता. या विक्रमामुळे हर्षिती असा विक्रम करणारी सर्वात लहान गिर्यारोहक ठरली आहे. तर हर्षितीच्या या यशस्वी प्रयत्नाची नोंद इंडिया बुक, एशिया बुक आणि वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने घेतली असल्याने, हर्षिती आता जागतिक पातळीवर झळकली आहे.यामुळे तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

भेंडखळ गावात राहणाऱ्या भोईर कुटुंबातील पाच वर्षीय हर्षिती हिला लहानपणापासून ट्रेकिंगची आवड असल्याचे तिच्या पालकांच्या लक्षात आल्यानंतर तिचा ट्रेकिंगचा प्रवास सुरू झाला. तिच्या या प्रावासाला गती येताच तिने राज्यातला सर्वात उंच कळसुबाई शिखर सर करून आपली नोंद "इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड" आणि "आशिया बुक ऑफ रेकॉर्ड" मध्ये केली होती.

यानंतर तिने 26 जानेवारी 2020 म्हणजेच प्रजासत्ताक दिनी श्रीवर्धन गड, मनरंजन गड, विसापूर गड, लोहगड आणि तिकोना गड हे पाच गड 12 तासात सर करण्याचा विक्रम केला होता. तिच्या या विक्रमाची दखल "इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, "आशिया बुक ऑफ रेकॉर्ड" आणि "वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड" या तीन संस्थानीं घेतली असून, तिला या संस्थानीं प्रमाणित केले आहे.

यामुळे पाच वर्षीय हर्षितीने आपले नावाची नोंद आता जागतिक पातळीवरही केली आहे. यामुळे संपूर्ण राज्यभरातून तिचे कौतुक केले जात आहे. तर शुभेच्छांचा वर्षावही होत आहे. हर्षिती भोईर या चिमुरडीने भेंडखळ गावासह जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव जागतिक पातळीवर झलकविले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.