Press "Enter" to skip to content

माथेरानचे माजी नगरसेवक पत्रकार संतोष पवार यांचे कोरोनाने दुःखद निधन

सिटी बेल लाइव्ह परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली !

सिटी बेल लाइव्ह / पेण (प्रतिनिधी)🔶🔷🔶🔷

माथेरानच – गिरिस्थान नगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा पत्रकार संतोष पवार यांचे आज कोरोनामुळे दुःखद निधन झाले आहे.

काल सकाळी थोडा ताप जाणवल्याने आज सकाळी कर्जत मधील दवाखान्यात दाखल करण्यात आले असता ऑक्सिजन लेवल तपासण्यात आली. ती ५४ असल्याने तातडीने नवी मुंबई येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी रूग्णवाहीके मधून घेऊन जात असता चौक जवळील एनडी स्टुडिओ च्या आसपास ऑक्सिजन संपल्याने नवीन लावण्याचे काम सुरू होते. मात्र प्रशिक्षित डॉक्टरांच्या अभावाने ऑक्सिजन लावण्यात दिरंगाई झाली व सर्व संपले.

पत्रकार संतोष पवार हे अतिशय मनमिळावू तसेच शांत स्वभावाचे होते.ते मराठी पत्रकार परिषदेचे माजी सरचिटणीस, प्रेस क्लब चे माजी जिल्हाध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भुषविले पत्रकारांच्या अनेक आंदोलनात त्यांचा सिंहाचा वाटा होता.त्यांनी अचानक एक्झिट घेतल्यांने संपूर्ण रायगड जिल्ह्यातील पत्रकांरानी दुःख व्यक्त केले आहे.



Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.