Press "Enter" to skip to content

प्रतापगडाच्या दुरुस्तीसाठी मनसे आमदार राजू पाटील यांची मदत

सिटी बेल लाइव्ह / डोंबिवली : विकास मेहेतर 🔷🔶🔷🔶

यंदाच्या पावसाळ्यात प्रतापगडाच्या माची खालचा डोंगर खचला आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम हे सह्याद्री प्रतिष्ठाणने घेतले आहे. हे काम लोकवर्गणी मधून सुरू झाले असून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी या कामाला पाच लाख रुपयांची मदत केली आहे.

मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांचे गडकिल्ल्यांवरील प्रेम हे जगजाहीर आहे. गडकिल्ले वाचवले पाहिजेत आणि त्यांचे संवर्धन केले पाहिजे असे नेहमीच मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे सांगत असतात. त्यालाच अनुसरून प्रतापगडाच्या माची खालच्या डोंगर दुरुस्तीसाठी मनसे आमदार यांनी मदत केली.देशभरातील दुर्गप्रेमींचे आवडते ठिकाण असलेल्या प्रतापगडाच्या माचीची वळणदार तटबंदी ही दुर्ग बांधणीतला परमोच्च आविष्कार मानली जाते. यंदाच्या पावसाळ्यात प्रतापगडाच्या माचीच्या तटबंदीतील डोंगर खचला आहे.त्याच्या दुरुस्तीला एकवीस लाख रुपयांचा खर्च असून सह्याद्री प्रतिष्ठान लोकवर्गणी काम करायचे ठरवले आणि त्याला नागरिकांनी मदत करायला सुरुवात केली आहे.तसेचमनसेचे नेते आणि कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी आर्थिक मदत केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.