Press "Enter" to skip to content

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणार्‍या ‘फेसबूक’वर कायदेशीर कारवाईची मागणी !


हिंदुविरोधी शक्तींच्या दबावाखाली येऊन हिंदूंचा आवाज दाबण्याचे ‘फेसबूक’चे षड्यंत्र ! – टी. राजासिंह, भाजप आमदार, तेलंगाना 🔶🔷🔷🔶


सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम) 🔶🔷🔶🔷


अनेक प्रक्षोभक भाषणे देणारा आणि आतंकवादाला खतपाणी घालणारा झाकीर नाईक, १५ मिनिटात १००करोड हिंदूंना संपविण्याची भाषा करणारे ‘एम्.आय्.एम्.’चे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांच्यासह अनेक देशविरोधी, जहाल संघटना अन् व्यक्ती यांची ‘फेसबूक अकाउंटस्’ राजरोसपणे चालू आहेत; मात्र सोशल मीडियाचा उपयोग केवळ राष्ट्र, धर्म आणि समाज यांच्या हितासाठी करणारे माझ्यासारखे हिंदु नेते, तसेच हिंदु धर्म आणि राष्ट्र यांप्रती जनजागृती करणार्‍या संघटनांची ‘फेसबूक पेजेस्’ बंद करून हिंदूंचा आवाज दाबवण्याचे फेसबूकचे षड्यंत्र आहे. हे सर्व हिंदुविरोधी शक्तीच्या दबावाखाली चालू असून ‘फेसबूक’वरही आता कायदेशीर कारवाई होऊ शकते, हे त्यांनीही ध्यानात ठेवावे, असे स्पष्ट प्रतिपादन तेलंगाना येथील भाजपचे हिंदुत्वनिष्ठ आमदार श्री. टी. राजासिंह यांनी केले. ते हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘फेसबूक का पक्षपात : हिंदुंओं के ‘पेज’ बंद, आतंकीयो के चालू !’ या विशेष परिसंवादात बोलत होते. ‘यू-ट्यूब’ आणि ‘फेसबूक’ यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम २८६३४लोकांनी पाहिला, तर ५४५४६लोकांपर्यंत पोचला. ‘सुदर्शन न्यूज’ या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके म्हणाले, ‘कोट्यवधी लोक जोडलेले ‘सुदर्शन न्यूज’ आणि माझे स्वत:चे ‘फेसबूक पेज’ काही महिन्यापूर्वी बंद केले. देश ‘डिजिटल इंडिया’ होईल; मात्र ‘डिजिटल हिंदुस्थान’ संपवायचा नसेल, तर भारताचे स्वत:चे सोशल मीडिया नेटवर्क निर्माण व्हायला हवे. फेसबूक जर असेच हिंदूंची ‘फेसबूक पेजेस्’ बंद करणार असेल, तर देशप्रेमी हिंदू ‘फेसबूक’ला या देशातून बहिष्कृत केल्याशिवाय राहणार नाहीत, हे त्यांनी लक्षात ठेवावे.’ सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता तथा ‘हिंदू फ्रंट फॉर जस्टीस’चे प्रवक्ता अधिवक्ता विष्णू शंकर जैन म्हणाले, ‘माहिती-तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ नुसार ‘फेसबूक’ने राष्ट्रहितासाठी कार्य करणार्‍यांचे ‘फेसबूक अकाउंटस्’ बंद करून एक प्रकारे ‘सायबर दहशतवाद’च आरंभला आहे. ‘फेसबूक’च्या या दहशतवादाविरोधात देशभरातील कुठल्याही न्यायायालयात याचिका दाखल केल्या जाऊ शकतात. सनातन संस्था, टी. राजसिंह यांचे ‘फेसबूक पेजेस्’ बंद करून लाखो लोकांचा आवाज बंद करण्याचा प्रकार ‘फेसबूक’ने केला आहे. केंद्र सरकारने ‘फेसबूक’वरच आता बंदी घालायला हवी.’ ‘सोशल मीडिया’चे अभ्यासक श्री. अभिनव खरे म्हणाले, ‘हल्लीच केंद्र सरकारने चीनच्या अनेक ॲपस् वर बंदी आणली, तशी ट्वीटर आणि फेसबूक यांच्यावर येऊ शकते, हे भय त्यांच्यात निर्माण झाले पाहिजे. जर भारतात या सामाजिक माध्यमांना काम करायचे असेल, तर आमच्या बहुसंख्यांक लोकांचा विचार करावाच लागेल.’ सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस म्हणाले, ‘संविधानिक, कायदेशीर आणि सुसंस्कृत भाषेचा प्रयोग करून सनातन संस्था जगभरात अध्यात्मप्रसाराचे कार्य करणारी अग्रणी संस्था आहे; मात्र ‘फेसबूक’ने सनातन संस्थेची ५‘फेसबूक पेजेस्’, तसेच संस्थेच्या अनेक साधकांची वैयक्तिक ‘फेसबूक अकाऊंटस्’वर बंदी आणली. यावरून ‘फेसबूक’चा हिंदु धर्म प्रसाराला आक्षेप आहे, हेच सिद्ध होते.’

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.