Press "Enter" to skip to content

आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

प्रथमच अधिवेशन अध्यक्षांच्या विना 🔶🔷🔶🔷

सिटी बेल लाईव्ह/ मुंबई.🔷🔶🔶🔷

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. कोरोना संकटामुळे दोन दिवसांच्या अधिवेशनात पुरवणी मागण्या, विनियोजन व निवडणुकांसंदर्भातील विधेयकांसह 14 विधेयक मांडली जाणार आहेत. कोरोनाच्या उपाययोजना, शिक्षण या विषयांवर अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता असून कोरोना रोखण्यासाठी सर्व ती खबरदारी घेऊन विधीमंडळ अधिवेशनासाठी सज्ज झाले आहे.

कोरोनाच्या संकटामुळे विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आटोपते घेतल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी पावसाळी अधिवेशन पार पडत आहे.

कोरोनामुळे एकत्र येण्यास बंधने असल्याने अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणारा चहापानाचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला. अधिवेशनाचा दोन दिवसांचा आटोपशीर कार्यक्रम ठरविण्यात आला असून प्रश्नोत्तरे आणि लक्षवेधी सूचना मांडण्यात येणार नाहीत. दरम्यान, विधान भवनात करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत दोन आमदार आणि 37 अधिकारी व कर्मचाऱ्य़ांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

विधानसभेचे कामकाज उपाध्यक्ष पार पाडणार

अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाल्याने पहिल्यांदाच अध्यक्षांच्या अनुपस्थितीत हे अधिवेशन पार पडणार आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभेचे कामकाज पार पडेल.

ही विधेयके मांडणार

महापालिकांच्या महापौर-उपमहापौर निवडणुकांसह, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर, ग्रामपंचायत निवडणुका, सहकारी संस्था निवडणुका, राज्य व्यवसाय, व्यापार, नोकऱ्य़ांकरील कर, अकस्मिकता निधी संदर्भातील सरकारने वाढलेले अध्यादेश सभागगृहासमोर मांडण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे यासंदर्भातील विधेयकेही मंजूर करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास विधेयक, महाराष्ट्र केश्म मालकी ही विधेयके मांडण्यात येणार असून पुरवणी मागण्यांच्या मंजुरीसाठी विनियोजन विधेयक अधिवेशनात मंजूर केले जाणार आहे.

चौकट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचं पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचे घेण्यात येणार आहे. आतापर्यंतची सर्व अधिवेशने विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापती यांच्या उपस्थितीत सत्ताधारी आणि विरोधकांमधील प्रश्नोत्तरांच्या जुगलबंदीमुळे गाजत असत. मात्र यावेळी सुरु होणारे पावसाळी अधिवेशन अध्यक्षांविना पार पडेल, असे होण्याची महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. कोरोनाची लागण झाल्याने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार नाहीत. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.