प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मागणीला यश 🔶🔷🔶🔷
संस्थापक अध्यक्ष आंबेगावे डी.टी.यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली होती मागणी 🔷🔶🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / समिर बामुगडे / मुंबई 🌟💠🌟💠
पत्रकांराना सरकार विमा संरक्षण देणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे यांनी दिलेली आहे.
दि.४ सप्टेंबर २०२० रोजी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आंबेगावे डी.टी. यांनी महाराष्ट्रातील पत्रकारांना ५० लाखांचा विमा जाहिर करून प्रत्येक रूग्णालयात पत्रकारांना बेडची व्यवस्था करावी अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन देऊन करण्यात आली होती.
ही बातमी महाराष्ट्रातील 300 पेक्षा जास्त संपादक व पत्रकार बांधवानी आपले वर्तमानपत्र,न्यूजपोर्टल,यूट्यूब चॅनलवर प्रसिध्द केली आहे. त्या सर्व संपादक व पत्रकार बांधव आणि प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी व सभासदांचे संस्थेतर्फे आभार मानण्यात आले आहे.
Be First to Comment