Press "Enter" to skip to content

एलअँडटीने केला इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशन व्यवसाय श्नायडर इलेक्ट्रिकला देण्याचा व्यवहार

सिटी बेल लाइव्ह / पनवेल (प्रतिनिधी) 🔶🔷🔷🔶

लार्सन अँड टुब्रो (एलअँडटी) या भारतातील इंजिनीअरिंग, तंत्रज्ञान, बांधकाम व वित्तीय सेवा क्षेत्रांतील आघाडीच्या समूहाने आपल्या इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशन (एलअँडटीईअँडए) व्यवसायामध्येनिर्गुंतवणूक करून हा व्यवसाय श्नायडर इलेक्ट्रिक या एनर्जी मॅनेजमेंट व ऑटोमेशन क्षेत्रातील जागतिक कंपनीला देण्याचा व्यवहार पूर्ण झाल्याचे आज जाहीर केले आहे.

ईअँडएचे अंदाजे ५ हजार कर्मचारी आता श्नायडर इलेक्ट्रिकच्या जागतिक परिवारामध्ये सहभागी होणार आहेत. नवी मुंबई, अहमदनगर, वडोदरा, कोइम्बतूर व मैसुरु येथे असलेले ईअँडएचे उत्पादन प्रकल्प आणि परदेशातील यूएई, कुवेत, मलेशिया व इंडोनेशिया येथील संबंधित उपकंपन्या श्नायडर इलेक्ट्रिकला हस्तांतरित केल्या जाणार आहेत.

स्थानिक स्तरावरील मंजुरी अद्याप प्रलंबित असल्याने सौदी अरेबियातील एलअँडटीइलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशन सौदी अरेबिया कंपनी लिमिटेड (एलटीईएएसए) उपकंपनीचे हस्तांरण आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर केले जाणार आहे.

मे 2018 मध्ये जाहीर करण्यात आलेला हा अत्यंत महत्त्वाचा व गुंतागुंतीचा, तसेच वैशिष्ट्यपूर्ण निर्गुंतवणूक व्यवहार आवश्यक नियमनात्मक मंजुरी मिळाल्यावर आणि गरजेच्या औपचारिक बाबी पूर्ण केल्यानंतर पूर्ण करण्यात आला आहे. भविष्यातील वाटचालीच्या दृष्टीनेएलअँडटीने निश्चित केलेल्या उद्दिष्टाच्या अनुषंगानेच हा व्यवहार करण्यात आला आहे.

एलअँडटीसातत्याने आपल्या व्यवसायांचे सातत्याने मूल्यमापन करते आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून भांडवलाची तरतूद करण्याचा निर्णय घेते. व्यवसायाचा आढावा घेतल्यानंतरच कंपनीने इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशन या व्यवसायातून बाहेर पडायचे ठरवले.

सदर निर्गुंतवणूक व्यवहार पूर्ण झाल्याबद्दल,लार्सन अँड टुब्रोचे समूह अध्यक्ष ए. एम. नाईक यांनी म्हटले: “ईअँडए व्यवसायाचा व्यवहार पूर्ण करणे, हा आम्ही आखलेल्या दीर्घकालीन धोरणातील एक महत्त्वाचा मैलाचा टप्पा आहे. आमच्या ग्राहकांच्या बाबतीत कमीत कमी बदल करावे लागणे आणि महामारीमुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांवर मात करणे, हे मुद्दे विचरात घेऊन,इतक्या भव्य प्रमाणावरील व्यवसाय विलग करणे, हे आमच्यापुढील आव्हान होते.

एलअँडटीने गेली काही दशके भरभराटीला आणलेला व्यवसाय आणखी पुढे नेण्यासाठीश्नायडर इलेक्ट्रिकहा योग्य साथीदार आहे, असे आम्हाला वाटते. श्नायडर इलेक्ट्रिकशी केलेला हा व्यवहार आमचे कर्मचारी, व्यवसायातील साथीदार व भागधारक अशा सर्वांसाठीच खऱ्या अर्थाने फायदेशीर आहे.”

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.