Press "Enter" to skip to content

लोकसंख्या वाढ .. एक चिंतेचा विषय

लोकसंख्या वाढ .. एक चिंतेचा विषय

११ जुलै  … जागतिक लोकसंख्या दिवस ..
संयुक्त राष्ट्र सभेच्या गव्हर्निंग कौन्सिल मध्ये लोकसंख्या दिवस जागतिक पातळीवर साजरा करण्याचा ठराव मजूर होऊन ११ जुलै १९८९ पासून हा दिवस जागतिक लोकसंख्या दिवस अशा स्वरूपात जगभर साजरा केला जातो . या वर्षीचे या दिनाचे घोषवाक्य Putting the breaks on KOVID -19 .How to safeguard the health of woman and girls now ”( कोविद १९ या विषाणू च्या  साथीला आ ळा घालणे व स्त्रिया व मुली यांच्या आरोग्याचे रक्षण करणे ) असे आहे . हा  लोकसंख्या दिन साजरा करण्याचे प्रयोजन म्हणजे लोकसंख्या वाढीला आळा घालणे व जागतिक पातळीवर आरोग्य सुविधा निर्माण करणे हा आहे . एका अंदाजानुसार इ स १००० साली जगाची लोकसंख्या सुमारे ४० कोटीच्या आसपास होती आज सुमारे ७०० कोटी५८ लाखाचा दरम्यान ही लोकसंख्या आहे . म्हणजेच गेल्या सुमारे १००० वर्षाच्या कालावधीत ४० कोटीवरून हा आकडा ७०० कोटी व ५८ लाखावर गेला . एका अंदाजानुसार जगाची लोकसंख्या २०५०  साली अंदाजे १००० कोटीच्या जवळ गेली असेल  व २१०० साली ती ११०० कोटीवर पोहचेल .  पृथ्वी वरील नैसर्गिक स्रोत कायम असताना लोकसंख्या वाढ जर अशाच वेगाने वाढत राहिली  तर अनेकांना पाणी , अन्न या गोष्टीना मुकावे लागेलं . आत्ता भारताचा विचार केल्यास १९४७ साली फाळणीच्या अगोदर भारताची लोकसंख्या ३९ कोटी एवढी होती. फाळणीनंतर ती ३३ कोटी राहिली . १९५० साली ती ३५ कोटी नव्वद लाखावर गेली . २०२० साली ही लोकसंख्या १३८ कोटी ७२ लाखावर गेली आहे . एका अंदाजानुसार २०३० साली ती १५१ कोटीच्या वर असेल . आज जगात सर्वात जास्त लोकसंख्येचा देश चीन आहे . २०२४ सालापर्यंत  भारत लोकसंख्येच्या बाबतीत चीनला सुद्धा मागे टाकेल व जगात सर्वात जास्त लोकसंख्येचे राष्ट्र ठरेल . जगातील भूमीचा विचार करता भारताकडे जगाच्या २. ४ टक्के भूमी आहे मात्र लोकसंख्येचा विचार करता ती जगाच्या १७.३१ टक्के एवढी आहे ( २०१८ साल ). एकूणच विचार करता लोकसंख्येची वाढ सतत होत आहे  . लोकसंख्यावाढीचा भयावह परिणाम जनमानावर होत आहे वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूक, स्वच्छता, पाणी पुरवठा , निवास, शिक्षण, आरोग्य या सुविधा मिळणे अवघड  होत आहे . त्यामुळे यापुढील काळात अन्न , वस्त्र व निवारा या मानवाच्या प्राथमिक गरजा सुद्धा भागविणे अवघड होणार आहेलोकसंख्यावाढीमुळे पाणी वापराचे प्रमाण वाढून त्याचीही फार मोठ्या प्रमाणात  टंचाई निर्माण  होत आहे . आतंरराष्ट्रीय जलव्यवस्थापन संस्थेच्या अंदाजानुसार २०२५ मध्ये पृथ्वीवरील एक अब्ज लोकांना पाणी मिळू  शकणार नाही .लोकसंख्या वाढीमुळे निसर्गावरही परिणाम झाला आहे. अनेक वृक्ष जाती, वनौषधी , पशु पक्षी, कीटक, यांचा नाश होत असून त्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे शहरी भागात बेघरांची संख्या वाढून जगणे अवघड होत चालले आहे . एकट्या मुंबईत सुमारे दोन लाख पन्नास हजार लोक रस्त्यावर राहणारे आहेत . संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालानुसार जगातील १० कोटी लोकांना  निवारा नाही . जगात सुमारे एक अब्ज लोक निरक्षर आहेत . तसेच ८४ कोटी लोक कायमचे भुकेले आहेत .आपल्या भारतातही मुलामुलींची लवकर लग्ने,मुलगा होईपर्यंत संतती वाढ, कुटुंब नियोजनाच्या साधनांची कमतरता, यामुळे जन्म दर अधिक राहिला आहे . विज्ञानांच्या प्रगतीमुळे ही आयुर्मान वाढत चालले आहे . या लोकसंख्या वाढीला आळा घालण्यासाठी समाजात जागृती, कुटुंब नियोजन प्रसार, जन्म प्रमाण नियंत्रण, अज्ञान निर्मूलन व शिक्षणाचा प्रसार हे कार्यक्रम जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त राबविले जात आहेत .एकूणच लोकसंख्या नियंत्रणात राखणे हे पुढील काळात  प्रगती व विकासाच्या दृष्टीने आवश्यक आहे

शांताराम वाघ

पुणे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.