Press "Enter" to skip to content

अखेर रियाचा भाऊ शोविक आणि मिरांडाला एनसीबीने केली अटक

सिटी बेल लाइव्ह / मुंबई 🔶🔷🔷🔶

अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूच्या प्रकरणात ड्रग कनेक्शन उघडकीस आल्यानंतर चौकशीदरम्यान एनसीबी सतत कारवाई करत आहे. आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास रियाच्या सांताक्रुज येथील राहत्या घरी आणि सॅम्युअलच्या अंधेरी येथील घरावर एनसीबीने छापेमारी केली. यानंतर शोविक आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअलला एनसीबीच्या मुंबई कार्यालयात आणण्यात आले, जिथे त्यांची चौकशी केली जात आहे. यावेळी सॅम्युअल मिरांडा याने अधिकाऱ्यांना सुशांतसाठी ड्रग्ज खरेदी करत असल्याचे सांगितले. अखेर आता शोविक आणि मिरांडा यांना NDPS Act अंतर्गत एनसीबीकडून अटक केली गेली आहे.

काही कायदेशीर बाबींची पूर्तता एनसीबीकडून करण्यात आली. सुशांत सिंग राजपूत प्रकरणातील ही पहिलीच अटकेची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.

याआधी ड्रग्ज कनेक्शन संबंधी कपिल झव्हेरी, अब्बास लखानी , फेयाज अहमद, परवेझ खान उर्फ चिकू पठाण, बासित परिहार, झेंद विलात्रा व करण अरोरा अशी अटक केल्याची नावे आहेत. झव्हेरी व अब्बास यांना मंगळवारी पश्चिम उपनगरातील अड्डयावर छापे टाकून अटक केली होती. त्यानंतर बुधवारी इतरांना अटक करण्यात आली. हे सर्वजण बॉलिवूड आणि पेज र्थी पार्ट्यामध्ये अंमली पदार्थ पुरवित असल्याचा अधिकाऱ्यांचा कयास आहे.

गौरव आर्या हा बासित परिहार याच्या संपर्कात होता. तो टॅक्सी ड्रायवरचे काम करतो, इच्छुक ठिकाणी त्याचबरोबर मालाची डिलिव्हरी करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविली जात होती. रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शोविक हा ही या तस्कराच्या संपर्कात होता. त्याने एकाकडे वडिलांसाठी अंमली पदार्थाची मागणी केल्याचे व्हॉटस अप मेसेज समोर आले आहेत. त्यानुषंगाने त्याची, गौरव आर्या, रिया चक्रवर्ती, तिचे वडील इंद्रजित यांच्याकडे एनसीबी चौकशी करणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.