Press "Enter" to skip to content

“सहजयोग ध्यान “या कार्यक्रमाचे निःशुल्क वेबिनार : 90 देशात कार्यक्रम

सिटी बेल लाइव्ह / राजेश बाष्टे / अलिबाग 🔷🔶🔷🔶

परम पुज्य माताजी “श्री निर्मलादेवी सहजयोग ध्यान ’’ पुर्ण जगभरात या दिव्य प्रणालीचा घरी बसून ” ” शिक्षक दिना” निमित्ताने निःशुल्क वेबिनार व युट्यूब माध्यमातून भारतात तसेच ९० देशात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक 05/09/2020 रोजी शिक्षक दिनी प.पुज्य माताजी निर्मला देवी या दिव्यप्रणालीचा संपूर्ण देशात तसेच विदेशात ठिकठिकाणी “सहजयोग ध्यान “या कार्यक्रमाचे निःशुल्क वेबिनार आणि युट्यूब च्या माध्यमातून घरी बसून आयोजन करण्यात आले आहे असे रायगड जिल्हा समन्वयक श्री. शिवाजी देशमुख यांनी सांगितले आहे.

यामध्ये दक्षता अथवा ध्यानधारणा योगासाठी संपुर्ण सहजयोग सुक्ष्म शरीर तंत्राची चेतनामय होण्याची घटनात्मक प्रक्रिया आहे, जी आत्माचे मिलन परमात्माशी होते, पमेश्वराशी एकरुप होणे ही योग क्रीया आहे. सहजयोग हा सामुहीक जनमानसात कार्य करतो व समाजाला सामुहिक आनंद प्रदान करतो, अबोधिता व पवित्राची देवता श्री गणेशाला प्रसन्न केल्याशिवाय सहजयोगात पुजा सिध्द व ध्यान होत नाही कारण श्री गणेशजी मुलाधार चक्राचे अधिष्ठाता देव आहेत आणि मुलाधार आध्यात्मिक यात्राचे प्रथम प्रवेशद्वार आहे हेच कारण आहे, अध्यात्मात श्री गणेशाला प्रथम पुजले जाते याचा उल्लेख गणपती अथर्वशिष्र्यात आहे.

सहजयोगात साधारण मानव त्रिआयामी होते कारण तो स्वतःला तीन स्तरावर जाणतो.
1. शरीर स्तरावर
2.बुध्दी स्तरावर
3. मनाच्या स्तरावर
परंतु योगाची घटना घटीत होते तेव्हा चौथ्या आयामात प्रवेश करतो आणि आत्माच्या स्तरावर स्वतःला ओळखतो यालाचा स्वतंत्र होणे असे म्हटले जाते अर्थात स्वतः चे तंत्र जाणणे. या सोबत नियमित साधना करतांना जेव्हा सहस्त्रार उघडते तेंव्हा प्रकाशित आत्मा, चित्त आणि प्रकाशित मस्तिष्क होवून पंच आयामी होतो. अतः मानवाला वाटते की आपल्या समाजाचे उत्थानासाठी सहजयोग हा जीवनात आत्मसात केला पाहिजे, हाच मानवतेचा उन्नत करण्याचा एक मात्र दिव्य प्रणाली आहे.

राष्ट्रीय सहजयोग ट्रस्टचे राष्टीय उपाध्यक्ष श्री दिनेशजी राॅय, नवी दिल्ली व महाराष्ट्राचे समन्वयक श्री.स्वप्नील धायडे – पुणे यांनी सांगितले की, सहजयोगचे विविध ध्यान प्रणाली व भजनाचे आँनलाईन कार्यक्रम भारताच्या सोबत किमान 90 देशातील सहजयोगी बंधु व भगिनी आपल्या घरातून लाॅक डाऊन मध्ये सामाजिक दूरी ठेवून (सोशल डिस्टसींग ) पालन करुन सदर ध्यानसाधनेत भाग घेत आहेत हे उल्लेखनीय अध्यात्मिक कार्य हे प्रतिष्ठान, पुणे येथे रोज सकाळी आणि संध्याकाळी आणि मातृवंदनाचा संगीत कार्यक्रम प्रति दिवस युटयूब चॅनेल प्रतिष्ठान पुणे येथून व फेसबुक इंडिया सहजयोग पेज वर लाईव्ह प्रसारित केला जातो, प्रतिष्ठान पुणे युटयुब चॅनेल लाॅकडाऊन पासून ते आतापर्यंत 1 कोटीहून अधिक व्हयुज व 8 करोड इम्प्रेषन प्राप्त झाले आहेत. नवीन साधकासाठी लर्नींग सहजयोगा युटयूब चॅनेलवर मराठी ,हिंदी, इंग्रजी या भाषेतून निशुल्क आयोजन करण्यात आले आहे.

विश्वाची इतिहासीक क्रांती तथा नवनिर्माण शिक्षक यांच्या हातात आहे, शिक्षक दिनाचे औचित्य साधून सहजयोग प्रतिष्ठान, पुणे द्वारे विनम्रपणे कळविण्यात येते की ,‘‘ शिक्षक – आंतरिक उत्क्रांती तथा वैश्विक क्रांती दूत’’ शिक्षकांना ध्यान तथा आत्मसाक्षात्कारचा प्रत्यक्ष अनुभव करण्यासाठी आँनलाईन माध्यमातून दिनांक 05 सप्टेंबर 2020 रोजी एक विशेष कार्यक्रमाची प्रस्तुती सकाळी १०.०वा. ते ११.३० वा. तसेच संध्याकाळी ५.०० वा ते ६.३० वाजेपर्यंत होणार आहे त्यासाठी सर्व शिक्षक बांधव व भगिनी कार्यक्रमास निमंत्रित आहे तरी सहजयोग प्रतिष्ठान पुणे यु-टयुब चॅनेल व फेसबुक इंडीया सहजयोग पेजवर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे महाराष्ट्राचे समन्वयक श्री. स्वप्नील धायडे व रायगड जिल्हा समन्वयक श्री. शिवाजी देशमुख व ‘सहजयोग ध्यान’ रायगड यांनी अवाहन केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.