Press "Enter" to skip to content

ईगल फाउंडेशनचे राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत) 🔷🔶🔷🔶

ईगल फाऊंडेशनच्या वतीने  कोरोना महामारीच्या कालावधीत तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या व्यक्तींची निवड जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाच्या जैविक महामारीने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. अशातच स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकजण सामाजिक बांधिलकी जपत मानवतेच्या दृष्टिकोनातून सेवाभावी कार्य करीत आहेत. अशा मान्यवरांना ईगल फाऊंडेशनच्या वतीने  सन्मानित करण्यात येणार आहे.

यामध्ये येवल्याचे आमदार नरेंद्र दराडे (राजकीय), अँड.संभाजीराव मोहिते(सामाजिक), सहाय्यक पोलीस आयुक्त मनिषा नलावडे (प्रशासकीय) , श्री निलेश चव्हाण ( उद्योजक ) , श्री गणेश शेळके (प्रशासकीय), डॉ.सौ.भुमिका प्रतापसिंह बेरगळ (महिला विकास), श्री डी.एस.काटे (अर्थ विषयक प्रख्यात लेखक व उद्योजक) , श्री शिवाजी चव्हाण (शिक्षण), प्रा.सतिश साठे (शिक्षण), डॉ.जितेंद्र अहिरराव (उच्य शिक्षण), श्री पोपट नलावडे (सामाजिक) , डॉ.संजय थोरात (वैद्यकीय) , प्रा.सुभाष हुलपल्ले (शिक्षण) , श्री प्रशांत चव्हाण  ( पत्रकार ) , श्री खंडू दुधभाते (माजी सैनिक ) , श्री अभिमन्यु शिंदे (शिक्षण) , पाकिजा उस्मान पटेल (शिक्षण ) , श्री राहूल कुंभार (शिक्षण) , श्री श्रीकांत सोनवणे (पत्रकार ) , श्री  निवृत्ती सदगीर (शिक्षण) , श्री विजय विश्वासराव (शिक्षण ) , श्री सागर भाट (शिक्षण ) , प्राचार्य हरिदास विधाते (उच्यशिक्षण) , श्री भारत चव्हाण (कला ) , श्री रामकिशन रौंदळे (राजकीय ), श्री धनाजी बेलेकर (शिक्षण ) , सौ.पुनम पाटील (उद्योजिका ) , सौ.संगिता शिवाजी शिंदे (सामाजिक), श्री सुरेश राजे (शिक्षण) , मनिषा चौधरी (शिक्षण), श्री शिवलाल राठोड (सरपंच), आयेशा नदाफ (शिक्षण)

          वरील सर्व मान्यवरांना ईगल फौंडेशन या सेवाभावी व नोंदणीकृत संस्थेच्या वतीने आकर्षक मानपत्र ,सन्मानचिन्ह, शाल ,श्रीफळ, देवून दिग्गज मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात  येणार आहे. लवकरच कार्यक्रमाचे नियोजन कळविण्यात येणार आहे.

    सदर निवड केल्याचे संस्थेचे अध्यक्ष श्री विलासराव कोळेकर, उपाध्यक्ष श्री सागर पाटील , सचीव  शेखर सुर्यवंशी ,प्रकाश वंजोळे, सुभाष भोसले,प्रा.तुकाराम पाटील , श्री बाबासाहेब राशिनकर,प्रा.स्मिता गिरी,श्री संजय नवले, प्रा.महेशकुमार मोटे,प्रा.सर्जेराव राऊत, श्री अशोक शिंदे,श्री राजेश जोष्टे यांनी जाहीर केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.