Press "Enter" to skip to content

कोरोना संकट हाताळण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी : ॲड रेवण भोसले


सिटी बेल लाइव्ह / उस्मानाबाद 🔶🔷🔶🔷

महाराष्ट्रात कोरोना महामारीने थैमान घातले असून श्रीमंत रुग्णांनी खाटा अडवल्या असल्याचे वक्तव्य करून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हे सरकार गोरगरीब रुग्णासाठी खाटा उपलब्ध करून देण्यास तसेच रुग्णांना उपचारासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यास हे सरकार हतबल असल्याचे एकप्रकारे स्पष्टपणे सांगून हे सरकार करुणा महामारी हाताळण्यास अपयशी ठरत असल्याची कबुलीच दिली असल्याची टीका जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड. रेवण भोसले यांनी केली आहे.

एकीकडे महात्मा फुले जनआरोग्य योजने मार्फत सर्वांना कोरोना उपचार मोफत देणार असल्याचे सरकार सांगत असताना दुसरीकडे मात्र गोरगरीब रुग्णाकडून रुग्णालय उपचाराचे पैसे उकळत आहेत. खाजगी रुग्णालयात गोरगरीब रुग्णांची मोठ्या प्रमाणात लूटमार होत आहे. त्यातच कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरमधील डॉक्टरांची कमतरता, व्हेंटिलेटर व रुग्णवाहिकाचा अभावामुळे पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला. सरकारच्या हलगर्जीपणामुळेच पुणे येथे वाहिनीच्या प्रतिनिधीचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात करुणाबाधितांची सर्वाधिक संख्या दिवसेंदिवस वाढत आहे ,त्यावर नियंत्रण आणण्यात हे सरकार अपयशी ठरत आहे. दिल्लीचे सरकारने कोरणा महामारी आटोक्यात आणण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम केले परंतु महाराष्ट्रात मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे तिन्ही पक्ष आपले सरकार वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत.

या सरकारला महाराष्ट्रातील करुणा वाढीबाबत कसलेही गांभीर्य नाही. त्याचप्रमाणे या तिन्ही पक्षाचे नेते दररोज वेगवेगळी विधाने करून राज्यात अस्थिरता निर्माण करताहेत. खाजगी रुग्णालय गोरगरीब रुग्णाकडून मोठ्या प्रमाणात पैशाची लूटमार करीत आहेत. तरी त्यावर सरकारचं कसलेच नियंत्रण नाही. राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असतानाही राज्य सरकार बेफिकीरपणे वागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या सरकारला सत्तेवर राहण्याचा काहीही अधिकार नाही असे स्पष्ट मतही ॲड भोसले यांनी व्यक्त केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.