Press "Enter" to skip to content

पत्रकारांसाठी पत्रकार भवन उभे करण्याचा निर्णय

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या भंडारा जिल्हा सभेत नियोजन 🔶🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह / भंडारा 🔷🔶🔶🔷

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,भंडारा जिल्हा कार्यकारणीची आपत्ती व्यवस्थापनाचे सर्व नियमांचे पालन करून दि.2/ सप्टेंबर / 2020 रोजी भंडारा येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची सभा पार पडली. ही सभा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे व राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आंबेगावे डी.टी. यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा पाठपूरावा करून भंडारा जिल्ह्यातील पत्रकारांसाठी पत्रकार भवन उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जिल्हा व तालुका कार्यकारणीचा विस्तार करणे, संघाच्या कामाकरिता लागणारी कागदपत्रे छापणे, जिल्हाअधिकारी व जिल्हा माहिती अधिकारी यांना निवेदन देण्याबाबतचे नियोजन, संघाच्या ग्रामीण व शहरी पत्रकारांना अधिस्वीकृती ओळखपत्र देण्यात यावे आदी विषयावर सखोल चर्चा व नियोजन करण्यात आले. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे विदर्भ सरचिटणीस शेखर बोरकर, भंडारा जिल्हाध्यक्ष देवानंद नंदागवळी ,जिल्हा कोषाध्यक्ष प्रवीण भोंदे,जिल्हा सहसचिव सेनपाल वासनिक, पवनी तालुका अध्यक्ष प्रशांत शहारे, लाखनी येथील पत्रकार जागेश्वर बांगाडकर व संघाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.