Press "Enter" to skip to content

CFS वाचवा कामगार वाचवा : कामगार संघटना व सीएफएस मालकांची बैठक

सिटी बेल लाइव्ह / सीबीडी बेलापूर 🔷🔶🔷🔶


जेएनपीटीवर आधारित एकूण ३५ सीएफएस (गोडाऊन) आहेत. गेल्या तीन वर्षापासून हे सीएफएस संकटात आहेत. त्यामुळे हजारो कामगारांचा रोजगार धोक्यात आलेला आहे. आतापर्यंत बरीच सीएफएस बंद पडली असून काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
सर्व सीएफएस संकटात आहेत. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी सीबीडी कोकण भवन येथे हे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ट्रान्सपोर्ट व माल हाताळणी कंपनीने मेसर्स पर फ्रेट सर्विसेसचे मालक जमशेद अश्रफ यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. यात सीएफएसमध्ये कार्यरत सर्व कामगार संघटना व सीएफएसचे मालक मुख्य कार्यकारी अधिकारी (c.e.o.) हे सहभागी झाले होते.

या बैठकीत संकटग्रस्त सीएफएसबद्दल सविस्तर चर्चा झाली. केंद्र सरकारचे डायरेक्ट पोर्ट डिस्चार्ज (DPD) व डायरेक्ट पोर्ट एन्ट्री (DPE) या धोरणामुळे सीएफएसचा धंदा फारच कमी झाला आहे. आणि गेल्या सहा महिन्यापासून आलेल्या कोरोना महामारीमुळे तो खालच्या पातळीला गेलेला आहे. घसरलेली अर्थव्यवस्था आयात-निर्यात व्यापारात कमी व गुजरातमधील बंदराकडे वळविलेला न्हावा-शेवा बंदरातीलचा धंदा या प्रमुख कारणांमुळे सीएफएस व येथील कामगार संकटात आलेले आहेत. चर्चेमध्ये सीएफएस व नोकऱ्या वाचविण्यासाठी सहकार्य करण्याचा निर्णय झाला.

सीएफएस बंद पडल्यामुळे प्रकल्पग्रस्त लेबर, सुरक्षारक्षक, सफाई कामगार, माथाडी कामगार, सर्वेयर कामगार, CHA कामगार, टेम्पोवाले, टपरीवाले, ट्रेलरवाले अशा अनेक जणांवर बेरोजगारीचे संकट आलेले आहे. हे सर्व सीएफएस वाचवून रोजगार वाचविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे धोरण कामगार संघटना घेणार आहेत. अशी माहिती कामगार नेते व जेएनपीटीचे विश्वस्त कॉम्रेड भुषण पाटील यांनी दिली.

धंदा कमी झाल्यामुळे कामगार कपात होऊ नये. यासाठी सर्व कामगारांनी शिस्तीने व जोमाने काम करण्यासाठी सर्व युनियन कामगारांना जागृत करतील. व या संकटात नोकरी वाचविणे. या गोष्टीचे महत्त्व पटवून देतील. तर व्यवस्थापन सुद्धा कामगार कायद्याचे पालन करून अनुचित प्रकार न करता कामगारांना सहकार्य करतील. यापुढे अशाच बैठका नियमितपणे होत राहून एकजुटीने एकमेकांचे प्रश्न समजून घेऊन कार्य करतील. असा निर्णय घेण्यात आलेला आहे.

या बैठकीत कामगारांतर्फे माजी आमदार मनोहर भोईर, इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, CITU चे नेते कॉम्रेड भूषण पाटील, दत्ता सामंत पुरस्कृत युनियनचे नेते वर्गीस चाको, रोशन घरत, शेकाप प्रणित युनियनचे नेते रवी घरत व सर्व CFS चे प्रमुख अधिकारी कॅप्टन निशित जोशी, कॅप्टन वापीवाला, श्री.अजित सिंग, श्री. सेलियन अशा सर्व सीएफएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. शेवटी सीएफएस वाचवा. रोजगार वाचवा. हा निर्धार करण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.