Press "Enter" to skip to content

वैभवशाली व्यवसायाकरिता वैभव सोनटक्के यांचे वेबिनार

आधुनिक वैभवशाली व्यवसायाकरिता वैभव यांचे वेबिनार

सुप्रसिद्ध आयटी तज्ञ वैभव सोनटक्के करणार मार्गदर्शन

अनलॉक डाऊन ची प्रक्रिया सध्या सुरू आहे. कोरोना विषाणू मुळे जगभर आलेल्या महामारी च्या कालखंडात मनुष्याला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. जवळजवळ प्रत्येकाच्या व्यवहार,व्यवसाय यामध्ये दोन पावले मागे यावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर नाविन्यपूर्ण तंत्राला क्रय शक्तीची जोड दिल्यास अभूतपूर्व किमया साधता येईल. किंबहुना झालेले नुकसान भरून काढण्यासाठी अशाच काहीशा गोष्टींची आवश्यकता असणार आहे.आज रात्री 9 वाजता होणाऱ्या वेबिनार मध्ये वैभव सोनटक्के अशाच महत्त्वपूर्ण गोष्टींवर प्रकाश टाकणार आहेत.
एक दशकाहून जास्त IT क्षेत्र आणि डिजिटल मार्केटिंग यामध्ये निष्णात असणारे वैभव सोनटक्के या वेबिनार च्या माध्यमातून इच्छुकांशी संवाद साधतील. व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय भरभराटीस आणण्याकरता वेबसाईट आणि मोबाईल ॲप्लिकेशन कशी उपयुक्त ठेवू शकतात? या मुख्य विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत. वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन अर्थार्जन कसे करावे ? हादेखील मुद्दा औत्सुक्याचा ठरणार आहे.मोबाइल तंत्रज्ञान आणि वेबसाईट्स यांचे भवितव्य काय आहे हे जाणून घ्यायचे असेल तर वैभव सोनटक्के यांच्या वेबिनार मध्ये आवर्जून सहभागी झालेच पाहिजे.तसेच या ट्रेण्डमधील नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे बद्दल देखील वैभव सोनटक्के इच्छुकांना अवगत करणार असल्याने हे वेबीनार निश्चितच वेगळ्या धाटणीचे आणि चुकवू नये! या कॅटेगरीमधले ठरणार हे विशेष!

Join Zoom Meeting


https://us04web.zoom.us/j/75568989518?pwd=cjBKUHB1RHE3dTcyWXlCUVlzMjBPQT09

Meeting ID: 755 6898 9518
Passcode: 2N1STi

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.