Press "Enter" to skip to content

महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रात सार्वमत घेण्याची मागणी


शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफीची फसवी घोषणा करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने सार्वमत घ्यावे : ॲड रेवण भोसले 🌟💠🌟💠


सिटी बेल लाइव्ह / उस्मानाबाद 🔶🔷🔷🔶

कर्जबाजारीपणा व नापिकीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे गाजर दाखवून सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रात सार्वमत घेण्याची मागणी जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते अॅड रेवण भोसले यांनी केले आहे.

एकीकडे कोरूना संसर्गाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासही सरकार अपयशी ठरत आहे तर दुसरीकडे कर्जबाजारी व लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे .बोल घेवडे व पोपटपंची सरकार रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभाराशी तुलना करून मुख्यमंत्री हे स्वतःचेच हसे करून घेत आहेत .राज्य सरकारने शेतकरी उध्वस्त करण्याचा विडाच उचलला आहे .

कर्जमाफीची ढोल बडवणाऱ्या राज्य सरकारने शेतकऱ्यांना मात्र ठेंगा दाखविला आहे. शेतकरी, शेतमजूर , कष्टकरी कामगार, बेरोजगार तरुण आदीं या सरकारच्या शेतकरीविरोधी व जनविरोधी धोरणामुळे उध्वस्त झाले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काहीही देणे घेणे नसणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या कर्जमाफी संदर्भात हास्यास्पद जाचक अटीनेच शेतकरी बेजार झाला आहे .

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरीविरोधी धोरण सरकारने आखल्या मुळे महाराष्ट्राच्या इतिहासाला कलंक लागला आहे. शेतकऱ्यांना पीककर्ज देणाऱ्या सरकारच्या घोषणेनंतरही बँका शेतकऱ्यांना जाचक सरकारी अटी व कागदपत्रांची कारणे पुढे करून कर्ज नाकारत आहेत .आर्थिक संकटात सापडलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी न करता सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची पोकळ घोषणा व थापा मारून शेतकऱ्यांचा भ्रमनिरास करत आहे.

दिल्लीमध्ये कोरूना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असताना दिल्ली सरकारने अहोरात्र परिश्रम घेऊन तो नियंत्रणात आणला परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा शरद पवार यांच्या सल्ल्यानेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्रीत बसून कारभार हाकीत आहेत म्हणून ते सर्व स्तरावर अपयशी ठरत आहेत.

राज्यातील सर्व उद्योगधंदे लॉक डाऊनमध्ये बंद असल्यामुळे सर्वांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे, त्यातच लॉकडाउनच्या कालावधीतील वीजमाफी ची घोषणा ही अशीच फसवी ठरत आहे. त्यामुळे आता संपूर्ण कर्जमाफी व शेतकऱ्यांच्या आत्महत्या या प्रश्नावर महाराष्ट्रात सार्वमत घेण्याची मागणी अॅड भोसले यांनी केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.