Press "Enter" to skip to content

चार शिकारी पोलीसांच्या जाळ्यात : वन्यजीव कायद्यानुसार गुन्हा दाखल

फासात अडकवलेले लांडोर

उरणच्या जंगलांमध्ये शिकाऱ्यांचा हैदोस ###

गावकरी आणि तरुणांनी कळविल्यावर वनविभाग जागे !! ###

सिटी बेल लाइव्ह / उरण ###

उरणच्या कोप्रोली गावानजीकच्या जंगलात शिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकून भेकर मरून गेल्याची घटना जून महिन्यात घडली होती ही माहिती ताजी असतानाच काल गुरुवारी याच जंगलात शिकारीसाठी आलेल्या चौघांना जिव्हाळा फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी आणि गावकरी मंडळींनी अक्षरशा जीवावर उदार होऊन पकडण्यात यश मिळविले आहे . काल दुपारी घडलेल्या या प्रकरणात जिव्हाळाच्या कार्यकर्त्यांनीच वन अधिकारी वर्गाला बोलावून ही कारवाई केली आहे पनवेल तालुक्यातील डोलवर परिसरातील ह्ये चार अवघ्या २१ ते २७ वयाचे युवक असल्याची माहिती मिळत आहे मात्र वन अधिकारी शशांक कदम यांच्याकडून अजूनही या शिकारी लोकांची नावे देण्यात आली नाहीत. विशेष म्हणजे भेकर शिकार प्रकरण झालेले असतानाही वन खात्याने कोप्रोलीच्या डोंगर भागात स्वतःहून गस्त वाढविणे , सुरक्षा रक्षक वाढविणे यापैकी काहीही केलेले नसल्याची बाबही या निमित्ताने स्पस्ट झाली आहे
उरणच्या पुर्व भागातील कोप्रोली परिसरात जंगल संवर्धनाचे काम काही वन्यजीव प्रेमी आणि वनप्रेमी करीत आहेत या निमित्ताने सुमारे लाखभर झाडांचे रोपण मागच्या काही वर्षांत झालं आहे.ते अजूनही चालू आहे. येणाऱ्या पिढ्यांना ती भेट म्ह्नणून हे काम वन्य प्रेमींकडून केले जात आहे मात्र मागील दोन महिन्यांपासून कोप्रोली ते पुनाडे कलंबूसरे डोंगर परिसरात शिकार होत असल्याचे दिसत होते. रानवाटा तुडवत असताना अनेकदा वाटेत लावलेले फासे उडवण्याची कामं नित्यनेमाने जिव्हाळा चे कार्यकर्ते अगदी जिव्हाळ्याने करीत आले आहेत. मागील महिन्यात एका सुंदर अशा नर जातीच्या तरुण उमद्या भेकराचा मृत्यू अशाच प्रकारे अज्ञातांनी लावलेल्या फासकीच्या तारेत अडकून झाला होतां. या जंगलात अनेकदा वन्यजीवप्रेमींना मोर, भेकर , डुक्कर, ससे असे अनेक प्राणी पक्षी पाहायला मिळत असतात .मात्र काळीज पिळवटून टाकणारी त्या भेकराच्या शिकारी नंतर वन्यजीप्रेमी वनविभाग सतर्क आपणच सतर्क राहायचे असे ठरवून होते. याच प्रयत्नांचा भाग म्हणून वन्यजीव प्रेमी सातत्याने या भागात फिरत होते त्यातऊनच त्यांना बुधवारी काहींनी जाळे टाकले आहे आणि ते निघून गेले असल्याची माहिती मिळाली त्यातूनच सावध झालेल्या वन्यजीवप्रेमी सदस्यांनी गुरुवारी त्या शिकारींना धडा शिकविण्याचा निश्चय करून तो तडीस नेण्याचे ठरविले होते . त्यानुसार गुरुवारी काही सदस्य रुपेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली तयारीतच होते त्यामध्ये यतीन, अश्विन आणि आनंद , बेलवाडीतील विजय कातकरी असे अनेकजण शिकारींच्या मागावर राहिले.त्यातूनच मोठे घबाड या कार्यकर्त्यांच्या हाती लागले असून त्यांनी लागलीच वनाधिकारी विभागाला पाचारण करून ही बाब कानावर घातली त्यांनी लगेच आपले अधिकारी पाठवले त्यामध्ये राऊतराय , वनरक्षक ढोले , इंगोले , बोरसे आदींनी धडक देत त्या शिकारींना रंगेहात पकडले त्यांच्याकडे सहा जिवंत लावरे पक्षी तर एक मृत प्राथमिक माहितीनुसार लांडोर अशा प्रकारचा पक्षी मृत अवस्थेत मिळून आला आहे . या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर भारतीय वन्यजीव कायदा १९७२ च्या कलम ९ नुसार कारवाई करण्यात आल्याची माहिटी वन अधिकारी शशांक कदम यांनी दिली आहे . त्या सर्वांना आज पाणेवळ येथील जिल्हा कोर्टात हजर करण्यासाठी घेऊन गेले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.