चौल आग्राव मार्गावरील खड्डेमय स्थितीबातत ग्रामस्थांनी केले भजन गात निषेध आंदोलन ! 🔷🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / रायगड / अमूलकुमार जैन 🌟💠🌟💠
अलिबाग तालुक्यातील चौल आग्राव येथील मार्गावर वर्षानुवर्ष फक्त खड्डे आणि खड्डेच नजरेत पडत आहेत.
याबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी संताप व्यक्त केला आहे.
एकीकडे गणेशोत्सव सुरू आहे परंतू ह्याच खडेमय मार्गावरून ग्रामस्थांना ये जा करावी लागत आहे. ह्याच मार्गावरून आग्राव कडून लालपरीदेखील धावते. हे सांगून नक्कीच आश्चर्य वाटेल अशी दयनीय अवस्था येथील मार्गावरील झाली आहे.
याबाबत ग्रामस्थांनी चक्क ढोलकी , टाळ वाजवत भजन करत अनोखे आंदोलन करत जनजागृती केली आहे. ग्रामस्थांनी भजन करत संताप व्यक्त केला आहे. पुढील १५ दिवसात जर का येथील मार्गावरील रस्त्यांची डागडुजी केली गेली नाही तर शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर उतरू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. आता तरी संबधिताना जाग येणार का ? हे पाहणे महत्वाचे आहे.
Be First to Comment