Press "Enter" to skip to content

संस्कार भारतीच्या वतीने गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन

रविवार दि.१२ जुलै रोजी दुपारी ४:०० वाजता होणार कार्यक्रम ###

प्रसिद्ध वक्ते प्रकाश पाठक यांचे ‘निसर्ग हाच गुरू’ या विषयावर व्याख्यान ###

सिटी बेल लाइव्ह / श्रीनिवास काजरेकर / पनवेल ###

संस्कार भारती पनवेल समितीच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त महानगरपालिका तसेच पोलिस या कोव्हिडयोद्ध्यांचा गौरव करण्यासाठी “गुरुवंदना” या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवार दि.१२ जुलै रोजी दुपारी ४:०० वा. हा कार्यक्रम संपन्न होणार असून प्रसिद्ध वक्ते प्रकाश पाठक यांचे ‘निसर्ग हाच गुरू’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. https://www.facebook.com/SanskarBhartiKonkanPrant/ या संस्थेच्या फेसबुक पेजवर सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्कार भारती, पनवेल समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.