Press "Enter" to skip to content

..हे तर मोगलांच्या वृत्तीने चालणारे सरकार !

धुळे येथील विद्यार्थी मित्रांना झालेल्या अमानुष मारहाणीचा जाहीर निषेध – विक्रांत पाटील, प्रदेश अध्यक्ष,भाजयुमो 🔷🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह / पनवेल 🌟💠🌟💠

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र भरातील विद्यार्थी परीक्षा न घेता जमा करण्यात आलेले परीक्षा शुल्क परत करावे व कोरोना मुळे नागरिकांची खालावलेली आर्थिक परिस्थिती पाहता येत्या 2020-21 या शैक्षणिक वर्षात शिक्षण शुल्क कमी करण्यात यावे अशा रास्त मागण्या करत आहेत, धुळे येथे याच मागण्या पालक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या समोर मांडण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत अत्यंत अमानुष मारहाण करण्यात आली, गोर गरीब विद्यार्थ्यांवरील या मारहाणीचा भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश म्हणून आम्ही जाहीर निषेध करीत असल्याचे भाजयुमो प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी सिटी बेल लाइव्ह शी बोलताना सांगितले.

कोणत्या गुंडांना ही अशी मारहाण करीत नाहीत अश्या अमानुष प्रकारची मारहाण धुळे पालक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या समोर त्यांच्या निर्देशानुसार गोर गरीब विद्यार्थी मित्रांना करण्यात आली,त्यामुळे हे मोंगलाई वृत्तीने चालणारे सरकार असल्याची टिका विक्रांत पाटील यांनी केली.

याच अनुषंगाने त्यांनी काही मागण्या केल्या आहेत –

१) कोरोना वैश्विक महामारीमुळे महाराष्ट्रातील अनेकांची आर्थिक परिस्थिती हालकीची झाली आहे याचा विचार करता विद्यापीठांचे शैक्षणिक वर्ष २०२० -२१ चे ३०% शैक्षणिक शुल्क कमी करण्यात यावे. तसेच उर्वरित आकारण्यात येणारे शुल्क हफत्यांमध्ये भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.

२) अंतिम वर्ष वगळता ज्या वर्षाच्या परीक्षा झाल्या नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना परत करावे.

३) अंतिम वर्ष वगळता ज्या वर्षाचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत. त्यामध्ये सरासरी गुणांच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आले परंतु जे विद्यार्थी प्रथम सत्रात सर्व विषयात उत्तीर्ण झाले होते. अशा विद्यार्थ्यांना देखील काही विषयात अनुत्तीर्ण केले आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकन करून निकाल घोषित करण्यात यावे. तसेच परिक्षेबाबाबत या धोरणाच्या पातळीवरील घोळामुळे जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत त्या सर्व विद्यार्थांच्या बाबतीत सहानुभूती पूर्वक विचार करून त्यांना उत्तीर्ण करण्यात यावे.

४) उपरोक्त मागण्यांसाठी दिनांक 26 ऑगस्ट 2020 रोजी धुळे येथील विद्यार्थ्यांनी पालक मंत्री अब्दुल सत्तार यांची वेळ मागितली परंतु असंवेदनशील पालक मंत्र्यांनी भेट नाकारली, यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांना समोर स्वतः च्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न केला;यावेळी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत व आदेशानुसार गोरगरीब विद्यार्थ्यांवर अमानुष मारहाण करण्यात आली, हा प्रकार अत्यंत लाजिरवाना आहे, आशा मंत्र्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही म्हणून त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा.

५) वरील एकूण परिस्थिती पाहता महाराष्ट्रात शिक्षणाचा बोजवारा उडाल्याची परिस्थिती आहे, कोरोना च्या काळातही विद्यापीठ व राज्यशासन विद्यार्थ्यांची व पालकांची लूट करत आहे, चुकीच्या निकलांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त करण्याचे पाप उच्च शिक्षण मंत्र्यांनी केले आहे, याची जबाबदारी स्वीकारत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदयसामंत यांचा राजीनामा घेण्यात यावा.

"या मागण्यांवर सकारात्मक निर्णय व्हावा याकरिता महाराष्ट्र भरात सर्व जिल्हा अधिकारी कार्यालय तथा तहसील कार्यालय येथे २७ व २८ ऑगस्ट रोजी निदर्शने करण्यात येणार आहेत आणि सकारात्मक निर्णय न झाल्यास भारतीय जनता युवा मोर्चा येत्या काळात महाराष्ट्र भरात या विषयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल याची नोंद घ्यावी." 

विक्रांत बाळासाहेब पाटील
प्रदेश अध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.