Press "Enter" to skip to content

“या” कारणामुळे कोसळली महाडची तारीक गार्डन

18 तासानंतर 4 वर्षाच्या मुलाला काढले सुखरूप बाहेर !

सिटी बेल लाइव्ह / महाड 🔶🔷🔷🔶

महाड येथील काजळपूरा परिसरातील तारीक गार्डन ही पाच मजली इमारत सोमवारी सायंकाळच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजून १७ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, इमारत पूर नियंत्रण रेषेत तळ्याच्या शेजारीच बांधण्यात आली असल्याची, धक्कादाक माहिती समोर आली आहे. या इमारतीजवळ पावसाळ्यात कमरेइतके पाणी साचत असल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं आहे.

महाड दुर्घटनेची गंभीर दखल घेत याप्रकरणी बिल्डरसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमारतीचे बांधकाम निष्कृष्ट दर्जाचे असल्याने इमारत पूर्णपणे ढासळली असून, संबंधितांवर कठोर कारवाईचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहे.

तसेच तत्कालीन मुख्याधिकारी, आर्किटेक्चर, नगरपालिका इंजिनिअर आणि आरसीसी कन्सल्टन्स अशा पाच जणांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. बिल्डरला अटक करण्यासाठी महाड येथून पथक रवाना झालं असल्याची माहिती मिळाली आहे.

बचावकार्य युद्धपातळीवर सुरु असून ढिगाऱ्याखालून एका चार वर्षाच्या चिमुकल्याला सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे.

निकृष्ट बांधकामाचा नमुना
तारीक गार्डन इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी रहिवासी संबधीत बिल्डरकडे करीत होते , मात्र नगरपरिषदेत तक्रारी करु नका मी दुरुस्ती करुन देतो अशी बोलवण या बिल्डरकडून केली जात होती , अशी माहिती या इमारतीमधील रहिवाशांनी दुर्घटनेनंतर दिली . दुर्घटना घडल्याच्या दिवशी सकाळी इमारतीच्या पार्कींगमधील एक पिलर ढासळल्याची तक्रार या इमारतीच्या रहिवाशांनी या बिल्डरच्या निदर्शनास आणून दिले , मात्र मी प्लास्टर करुन देतो, अशी रहिवाशांची समजूत काढून त्यांची पुन्हा बोळवण केली , आणि त्यानंतर केवळ सात आठ तासातच ही इमारत पुर्ण कोसळून ही दुर्घटना घडली .

मृतांची नावे
– नाविद झमाने (३५) -नौसीम नदीम बांगी (३५) -आदी शेखनाग (१४) – मतीन मुकादम (१७) – फातीमा शौकत अलसुरकर (६०) – रोशनबिबी दाऊदखान देशमुख (७५), – इसमत हसीम शेखनाग (३५) – फातीमा शरीफ अन्सारी (४३) – अल्तमश मेहबुब बल्लारी (२६) – शौकत आदम अलसुरकर (६३) – आयेशा नदीम बांगी (७) – रुकैया नदीम बांगी (२)

जखमींमध्ये नामिरा शौकत मसुरकर वय १९, फरीदा रियाज पोरे, नवीद हमीद दुस्ते ३२, महमद बांगी वय ८ हे जखमी झाले आहेत. तर मदत करणारे शेजारील स्वप्नील प्रमोद शिर्के वय २४ जयप्रकाश कुमार, संतोष सहानी, दीपक कुमार हे बचाव कार्यातील जवान देखील जखमी झाले आहेत.

तारीक गार्डन इमारत दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रत्येक मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची शासकिय मदत देण्याची घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज महाडमध्ये केली . या दुर्घटनेत या इमारतीतील कुटुंबीयांनी आपले सर्वस्व गमावले आहे, याउप्परही या कुटुंबाना मदत आणखी आर्थिक मदत करण्याबाबत उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाईल असेही सुतोवाच ना वडेट्टीवार यांनी यावेळी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.