Press "Enter" to skip to content

पेण मध्ये कोरोनाच्या या महामारीत गुटखा विक्री तेजीत

पेण अन्न औषध प्रशासनाचे दुर्लक्ष 🔷🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह / पेण ( राजेश कांबळे ) 💠✳️🌟🔆

कोरोनाच्या लॉकडाउनमुळे सर्वच व्यावसायिकांवर संक्रांत आलेली असताना मात्र गुटखा विक्रेत्यांची पाचही बोटे तुपात आहेत या दरम्यान पेण तालुक्यात गुटखा विक्री तेजीत सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे.

केंद्रासह राज्य शासनाने सुगंधित गुटखा, विमल, पान मसाला आदी उत्पादने पानपट्टी किंवा किराणा मालाच्या दुकानात विक्री करण्यास बंदी लादलेली असून देखील तालुक्यात अनेक ठिकाणी तसेच रस्त्यांवरील पानपट्ट्यांमध्ये गुटखा विक्री होत आहे मात्र याकडे अन्न औषध प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने त्यामुळे कोरोनाच्या या महामारीत दुकानदार गुटखा आणि विमल पान मसाला चढ्या दराने अवैध विक्री करीत आहेत. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन करून अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्यांवर धाड टाकून कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

शासनाने गुटखा, विमल सुगंधित सुपारी यांना राज्यात बंदी घातली आहे जर कोरोनाच्या या महामारीत अशा प्रकारे पेणमध्ये चढ्या भावाने दुकानदार छुप्या पध्दतीने विक्री करीत असल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल सदर दुकांनांवर पोलीस प्रशासनाना देखील कारवाई करण्याचे अधिकार दिले आहेत त्यामुळे ज्या ठिकाणी असे अवैध धंदे सुरू असतील तेथे आम्ही आणि पोलिस प्रशासन संयुक्तपणे कारवाई करणार.

ल.अ.दराडे -- अन्न औषध प्रशासन अधिकारी

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.