नवी शक्कल! सोलापुरात पीपीई कीट परिधान करून सहा दुकाने फोडली; 50 लाखांचा ऐवज लंपास
सिटी बेल लाईव्ह/ सोलापूर.
पीपीई कीट परिधान करून आलेल्या चोरट्यांच्या टोळीने शहरातील सहा मोबाइल शॉपी फोडत सुमारे 50 लाखाचा ऐवज लंपास केला आहे. लॉकडाऊनमधून आता कुठे व्यापारी नव्या उमेदीने व्यवसायाला लागले असतानाच चोरट्यांनी लुट केल्याने व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरात चोरट्यांनी पीपीई किट घालून धुमाकूळ घातला आणि वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील 5 मोबाईलची व 1 कॉम्प्युटरचे दुकान फोडून 200 मोबाईलसह सुमारे 50 लाखांचा ऐवज लंपास केला.
दरम्यान, चारचाकी गाडीतून आलेल्या या टोळीतील चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. या घटनेने कोरोना व लॉकडाऊनमधून सावरत असलेल्या व्यापार्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Be First to Comment