सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे) 🔷🔶🔷🔶🔷
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून वेद फाऊण्डेशनच्या वतीने संपन्न करण्यात आलेल्या पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी पर्यावरणप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला.
नेहमीच सामाजिक, शैक्षणिक, कला,क्रीडा,पत्रकारिता व साहित्य क्षेत्रात विविधांगी उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपणा-या वेद
फाउंडेशन द्वारा स्वातंत्र्य दिन व पश्चात पर्यावरण पूरक सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सध्या टाळेबंदीमुळे व्यक्ती घराबाहेर जास्त वेळ व्यतीत करू शकत नाही. त्यामुळे या स्वातंत्र्यदिनी औषधी किंवा खाद्य वनस्पती घरी आणून त्याचे संगोपन करावे असे अवाहन वेद फाउंडेशन या संस्थेमार्फत करण्यात आले होते.
सदर आवाहनास प्रतिसाद देत डॉक्टर वैभव पाटील, पत्रकार केशव मस्के, सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मरवडे, पत्रकार कल्पेश पवार,विलास देवळेकर, प्रमिला जाधव, मंजू सराठे, कल्पना शिंदे, रश्मी सराठे, प्रकाश केणी, चंद्रशेखर मात्र्हे, रश्मी जोशी, अनंत मोरे इत्यादी सामाजिक कार्यकर्त्यांनी बीजारोपण तथा वृक्षारोपण करत आपला सहभाग नोंदवून वेद फाऊण्डेशनच्या या उपक्रमात सहभाग दर्शवून पर्यावरण संवर्धनासाठी छोटेसा सहभाग घेतला. तर वेद फाऊण्डेशनचे प्रमुख स्वपनील वाडेकर आणि त्यांच्या सर्व टिमने सहभागी सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरणप्रेमी नागरिकांना आँनलाईन प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. वेद फाऊण्डेशनचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या या आँनलाईन पर्यावरण संवर्धन उपक्रमाचे समाजातील सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.
Be First to Comment