Press "Enter" to skip to content

7 वर्षाची जोई पाटील बनली फॅशन क्वीन

उरणच्या जोई पाटील चा ऑनलाईन फॅशन स्पर्धेत विषेश जलवा ! 🔷🔶🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 💠✳️💠✳️💠

उरणमधील जोई पाटील या ७ वर्षीय मुलीने लॉकडाऊन काळातही ऑनलाईन स्पर्धा करत विशेष प्राविण्या मिळवत आपल्या कलागुणांना वाव दिला आहे. फॅशन शो, चित्रकला, सामाजिक संदेश यासारख्या स्पर्धा तिने ऑनलाइन केल्या आहेत. तर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तिने विद्यार्थ्याना मिळालेल्या वेळेचा उपयोग कसा करता येईल याबाबत संदेशही दिले आहेत.

कोरोना काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थी मोबाईलवर अथवा टीव्हीवर कार्टून पहाताना दिसत आहेत. मात्र उरण शहरात राहणाऱ्या जोई पाटील या ७ वर्षीय चिमुरडीने मिळालेला वेळ हा ऑनलाइन स्पर्धा करून आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी घालवला आहे. चक्क फॅशन शो स्पर्धाही तिने ऑनलाइन दिल्या आहेत. दिलेल्या विषयानुरूप पेहराव करून एक वॉक करून ऑनलाइन स्पर्धा करीत होती.

जोई पाटील हिने दोन वर्षात १५ फॅशन कॉम्पिटीशन केल्या आहेत. तर या स्पर्धामधून अनेक टायटलही तिने मिळवले आहेत. तर जाहिरात, सामाजिक संदेश, लघुपट यामध्येही तिने आपली चमक दाखवली आहे. तर लॉकडाऊनमध्ये तिने केलेल्या कामाची दखल घेऊन अवस्युलेट ग्लॅम कॉसमटीक प्रॉडक्ट, टाईमलाईन वॉचेस आणि किवी स्नॅक्स या तीन कंपन्यांनी तिला ब्रँड अंबॅसिडर केले आहे. याबाबत तिचे वडील निखिल पाटील प्राउड फील होत असल्याचे सांगतात.

अवघ्या ७ वर्षात तिने जे प्राविण्य मिळवले आहे त्याचे संपूर्ण श्रेय जोई आपली आई श्लोक पाटील हिला देते. तर पालक हे मुलांसाठी आरसा असतात. आपण जे करू त्याचप्रमाणे आपली मुले करत असतात. यामुळे मी स्वतः तिच्याकडे लक्ष देऊन मार्गदर्शन करते वडील निखिल पाटील सांगतात. तर लहान मुलांनी मिळालेल्या वेळेचा उपयोग मोबाईल आणि टीव्ही मध्ये न घालवता त्या वेळेचा उपयोग आपल्या आपल्या करिअरच्या दृष्टीने करावा असं जोई पाटील विद्यार्थी मित्रांना सांगत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.