Press "Enter" to skip to content

माजी आमदार रामनाथ मोते सर यांचे निधन

शिक्षकांचा आधार वड हरपला

सिटी बेल लाईव्ह/ मुंबई.

महाराष्ट्र  राज्य शिक्षण क्रांती संघटनेचे मा. अध्यक्ष तथा कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार आदरणीय श्री. रामनाथ मोते सर यांचे दुःखद निधन झाले आहे.
      एक अत्यंत अभ्यासू, परखड व शिक्षण चळवळीतील आत्यंतिक तळमळ असलेल्या गुरुतुल्य व्यक्तीला आपण गमावले असल्याची प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातील मंडळीनी दिली आहे.

शिक्षकांचा आधारवड हरपला
    

     शिक्षकांसाठी स्वतःचे पूर्ण आयुष्य खर्ची घालणारे सर्वांचे जवळचे शिक्षक मा.आमदार रामनाथ आण्णा मोते सर यांचे आज सकाळी देहावसान झाले.
     मा.शिक्षक आमदार रामनाथ आण्णा मोते सर हे  स्वतः शिक्षक व अभ्यासु असल्याने त्यांनी सातत्याने शिक्षकांचीच बाजू घेऊन  ते लढत राहिले. शेवटपर्यंत शिक्षकांच्या प्रश्नासाठी लढत राहिले. सेवावर्ती ,त्यागी असलेले मोते सर यांनी शिक्षकांसाठी स्वतःच्या संसाराची देखील तमा बाळगली नाही.
    भारतीय जनता पार्टी ने कोकण शिक्षक मतदार संघातून त्यांची उमेदवारी नाकारल्यामुळे हा मतदार संघ भाजपा च्या हातून निसटला.शिक्षक सदस्यांच्या आग्रहामुळे मोते सरांनी निवडणूक अपक्ष म्हणून लढवली.फारसे घराबाहेर न पडता देखील त्यांनी पाच हजारांहून अधिक मते मिळवली होती.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.