Press "Enter" to skip to content

जिल्ह्यातील ७९ आरोग्य सेवकांची सेवा नियमित करा : आ.महेंद्र दळवी

सिटी बेल लाइव्ह / संजय कदम / मुंबई 🔶🔷🔶🔷


रायगड जिल्ह्यातील आरोग्य सेवक पदावर काम करीत असलेल्या ७९ स्थायी आरोग्य सेवकांची सेवा सेवाखंड क्षमापित करुन मूळ नेमणूक दिनांकापासून सेवा नियमित करुन पदोन्नती द्यावी अशी मागणी अलिबाग – मुरुड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे .

रायगड जिल्ह्यामधील आरोग्य विभागात ७९ आरोग्य सेवक कार्यरत आहेत . सेवाखंड क्षमापित करुन मूळ नेमणूक दिनांकापासून सेवा नियमित करण्यासाठी त्यांनी शासनाकडे वारंवार मागणी करुनही. त्यांना अद्यापी न्याय मिळालेला नाही . तसेच कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठता , पदोन्नती याला अनुसरुन मिळणारे आर्थिक व इतर लाभांपासून गेली अनेक वर्षे कर्मचारी वंचित राहिलेले आहेत . तसेच अनेक कर्मचारी शासनाच्या विहीत वयोमर्यादेच्या नियमानुसार सेवानिवृत्त झालेले आहेत . आपल्या माहितीप्रमाणे या कर्मचाऱ्यांच्या नंतर सेवेमध्ये रुजू झालेल्या नवीन स्थायी आरोग्य सेवकांना पदोन्नती देण्यात येत असल्याचे समजते . तरी रायगड जिल्ह्यामधील ७९ स्थायी आरोग्य सेवकांची सेवा त्यांच्या मूळ नेमणुकीच्या दिनांकापासून नियमित करुन त्यांना पदोन्नती देण्यात यावी , अशी मागणी अलिबाग – मुरुड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांच्याकडे केली आहे .

आरोग्यमंत्री ना . टोपे यांनीही आ . दळवी यांच्या मागणीवर सकारात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.