Press "Enter" to skip to content

कवी नासा येवतीकर यांची कविता : संपू दे कोरोना

सिटी बेल लाइव्ह / काव्य कट्टा ###

।। संपू दे कोरोना ।।

कोरोनाचा आकडा
रोजच वाढतो आहे
काळजीने मनुष्याचा
जीव काढतो आहे
………. ।। १ ।।

लस मिळेपर्यंत कोरोना
आटोक्यात नाही येणार
असा वाढतच राहिला तर
अनेकांचे जीव ही घेणार
………… ।। २ ।।

याची काळजी करण्यापेक्षा
काळजी घेणे हाच उपाय
उगीच बाहेर जाण्यापेक्षा
घरातच राहू द्या ना पाय
………… ।। ३ ।।

एकामुळे दुसऱ्यांचा यात
जातो हकनाक बळी
लॉकडाऊनचे नियम
जरा उतरू द्या गळी
………… ।। ४ ।।

काही दिवसांत येणार आहे
सर्वांचा सुखकर्ता दुःखहर्ता
देवा, तुझ्या आगमनापर्यंत
संपू दे ही कोरोनाची वार्ता
…………. ।। ५ ।।

  • नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा, धर्माबाद
    9423625769

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.