Press "Enter" to skip to content

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांचा नवा रेकॉर्ड

फक्त पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आज 165 रूग्ण : पनवेल चे लाॅकडाऊन फेल ? ###

सिटी बेल लाइव्ह / पनवेल ###

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आज कोरोना रूग्णांच्या संख्‍येने नवा रेकॉर्ड स्थापन केला. आज तब्बल 165 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे पनवेल मध्ये करण्यात आलेले लाॅकडाऊन सबशेल फेल तर गेले नाही ना ? अशी चर्चा रंगू लागली आहे.

काल महानगरपालिका क्षेत्रात नेहमीपेक्षा थोडे कमी रुग्ण सापडले होते. त्यामुळे थोडे हायसे वाटत असतानाच आजचा आकडा पाहून सर्वजण चक्रावून गेली आहेत.

आज महानगरपालिका क्षेत्रात 2 रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. सध्या येथे 1234 इतके अ‍ॅक्टिव्ह रूग्ण आहेत तर 92 रूग्ण बरे देखील झाले आहेत.

आज सापडलेल्या रुग्णांमध्ये पनवेल शहर 27, नवीन पनवेल 9, खांदा कॉलनी 3, कळंबोली 27, कामोठे 20, खारघर 21, तळोजा 9 रूग्णांचा समावेश आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.