Press "Enter" to skip to content

पनवेलमध्ये शेकापला मोठे भगदाड : भाजपाच्या कमळाला आणखी बहर 

नगरसेवकपद वाचविण्यासाठी नगरसेवकांच्या पती – पत्नी -भावाच्या भाजप प्रवेशाची खेळी 🔷🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह / पनवेल (प्रतिनिधी) 🔶🔷🔶🔷

गेले अनेक महिने शेतकरी कामगार पक्षात धुमसत असलेल्या राजकारणाचा आज अखेर स्फोट झाला. या स्फोटात शेकापक्षाच्या पनवेल मधील बालेकिल्याला चांगलेच खिंडार पडले आहे. माञ त्याचबरोबर शेकापक्षाच्या नगरसेवकांनी आपले नगरसेवकपद वाचविण्यासाठी स्वत: थेट प्रवेश न करता आपल्या पती, पत्नी किंवा भावाचा प्रवेश घडवुन आणण्याची खेळी केली आहे.

आज गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला आज (दि. २१) पनवेल महानगरपालिकेतील शेकापचे नगरसेवक हरेश केणी यांचे बंधू आणि शेकापच्या नगरसेविका शीतल केणी यांचे पती दिनेश केणी, नगरसेवक बबन मुकादम यांच्या पत्नी महिला जिल्हाध्यक्षा व जिल्हा परिषदेच्या माजी सभापती प्रिया मुकादम, नगरसेविका जयश्री म्हात्रे यांचे पती रविकांत म्हात्रे, शेकापचे चिटणीस कैलास घरत, पुरोगामी संघटना अध्यक्ष महेश साळुंखे, व्यापारी संघटना अध्यक्ष गणेश घरत यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपात जाहीर प्रवेश केला.

हा पक्षप्रवेश सोहळा पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार रविंद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, सुनील घरत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, शहर सरचिटणीस नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक अनिल भगत, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, कामोठे अध्यक्ष रविंद्र जोशी, यांच्यासह नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते. 
           

भाजप सर्वसामान्यांचा विचार करणारा पक्ष - लोकनेते रामशेठ ठाकूर
 
भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य नागरिकांचा विचार करणारा पक्ष आहे. तळागाळातील घटकाचाही विकास झाला पाहिजे, हा मूलमंत्र जपणारा आणि अन्यायाविरुद्ध लढणारा हा पक्ष आहे. तुम्ही देशाचा विकास आणि विचार करणाऱ्या पक्षात दाखल झाले आहेत. तुमच्यात काम करण्याची धमक आहे. त्यामुळे तुम्ही योग्य पर्याय निवडला असून लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी एकसंघ काम करीत राहू या. नगरसेवक हरेश केणी यांचा स्वभाव नॅच्युरल आहे. त्यामुळे विधासभा निवडणुकीत त्यांना मते मिळाली त्यांच्या जागी शेकापचा दुसरा उमेदवार असता तर त्याला एवढी मते मिळाली नसती. 
भाजप नुसता पक्ष नाही तर मोठे कुटुंब - माजी मंत्री रविंद्र चव्हाण 
 
भाजप नुसता पक्ष नाही तर मोठे कुटुंब आहे. रायगड जिल्ह्याचे कुटुंबप्रमुख लोकनेते रामशेठ ठाकूर सक्षम नेतृत्व आहे. त्यामुळे रायगडच्या कुटूंबात सर्वजण सुरक्षित आहेत. प्रथम राष्ट्र नंतर पक्ष त्यानंतर स्वतः हा भाजपचा मूलमंत्र आहे. येणारा काळ शांत प्रतिशत भाजप आहे. सर्व विषयाला न्याय देण्याचे काम केंद्र सरकार आणि येणारे राज्य सरकार करीत राहील. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्व देशाला अभिमान - आमदार प्रशांत ठाकूर  

देशाचे नेतृत्व असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्व देशाला अभिमान आहे. प्रथम संसदेत गेल्यावर या लोकशाहीच्या मंदिराला नमन करून त्यांनी लोकशाहीचे महत्व जगाला पटवून दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली जाहीरनामा प्रत्यक्षात आणण्याचे काम झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्तृत्वाने खरे करणारा नेता त्या पक्षात काम करण्याची आपल्याला संधी मिळाली आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गोरगरीब नागरिक उपाशी राहू नये यासाठी उपक्रम राबविला. पनवेलमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ८० हजारहून अधिक लोकांना कोरडा अन्नधान्य, मोदी भोजन कम्युनिटी किचनच्या माध्यमातून १ लाखाहून अधिक भोजन, मास्क, सॅनाटयझर, व इतर आवशयक साहित्य दिले, उरणचे आमदार महेश बालदी आणि पेणचे आमदार रवीशेठ पाटील यांनीही त्यांच्या मतदार संघात नागरिकांना भरभरून मदत केली. कोरोना व लॉकडाऊन परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना आधार देण्याचे काम केले याचा अभिमान आहे. त्यामुळे एक कुटूंब म्हणून आपण सर्वजण काम करीत राहू या.

माझ्याकडे महिला संघटना मोठी आहे, त्यांच्यासाठी मला काम करायचे आहे, संघटनेच्या महिलांना न्याय त्याकरिता मी आज प्रवेश केला आहे. मला काम करण्याची संधी द्या, मी संधीचे सोने करीन.  पक्ष वाढीसाठी सतत काम करीत राहीन. – प्रिया बबन मुकादम 

 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.