Press "Enter" to skip to content

दाभोळकरांच्या खूनाचे सूत्रधार कोण ? प्रश्न अजूनही अनुत्तरित

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृती दिनानिमित्त महाराष्ट्र अंनिस रायगड शाखेची “व्हर्च्युअल निषेध रॅली” 🔷🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत) 💠✳️💠✳️

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृती दिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती, रायगड शाखेने “व्हर्च्युअल निषेध रॅली” चे आयोजन केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेसबुकवर सर्व कार्यकर्ते व समविचारी लोकांनी एकत्र येऊन ही रॅली काढली होती. 

दाभोळकरांच्या खूनाला 7 वर्ष होऊनही खूनाचे सूत्रधार कोण ? मारेकऱ्यांवर कोर्टात आरोपपत्र केव्हा ठेवणार ? अशा अनेक प्रश्नांवर संताप आणि निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला. तपास नेमका कुठपर्यंत आला, आरोपी अद्याप मोकाट असल्याची चीड महाराष्ट्रभर व्यक्त करण्यात आली. तसेच चळवळीची गाणी, कविता, भाष्य, घोषणा आदींच्या स्वरूपात कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व निषेध यावेळी व्यक्त केला.

या व्हर्च्युअल रॅलीमध्ये रायगड मधील सर्व अंनिस शाखा, जिल्हा शाखा यांच्यासह राज्य उपाध्यक्ष डॉ. प्रदीप पाटकर, राज्य सरचिटणीस नितीनकुमार राऊत, रायगड जिल्हाध्यक्ष विवेक सुभेकर, शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील, श्रमिक मुक्ती दलाच्या सुरेखा दळवी, राष्ट्रसेवा दल अल्लाउद्दिन शेख, सर्वहारा जन आंदोलनाच्या उल्का महाजन, मानसोपचार तज्ञ डॉ. अनिल डोंगरे, युसूफ मेहेरअली सेंटर, ताराचे संतोष ठाकूर आणि अंनिस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारकडे 4 मागण्या केल्या.

1) दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी व गौरी लंकेश हे सर्व चार खून एकमेकात गुंतलेले असल्यामुळे केंद्रीय आणि राज्य सरकारच्या यंत्रणांचा सुसंवाद होणे आवश्यक आहे. आणि यासाठी चारी खूनांचा तपास व्यवस्थित होण्यासाठी एका विशेष तपास टीम गठीत करावी. 

2). खूनात सहभागी असलेल्या संघटना आणि सूत्रधारांना अटक व्हावी आणि आणि त्यांची संपत्ती जप्त करण्यात यावी. 

3). चारही केसेस मध्ये सरकारने चांगल्या वकिलांची नियुक्ती करावी.

4). अशा धार्मिक मुलतत्ववादी लोक आणि संघटनांच्यावर बंदी आणावी. 

5). सामाजिक कार्यात सहभागी असलेल्या  लोकांच्या जीवांचे रक्षण करण्यासाठी एक कडक कायदा करावा. आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

One Comment

 1. J A Raut J A Raut August 22, 2020

  स्वातंत्र्य पुर्वी इंग्रजांच राज्य होते
  त्याकाळी सामाजिक, शैक्षणिक ,व इतर अनेक कार्ये करताना सत्ताधारी घटकांचा विरोध नव्हता पण..
  सनातन प्रव्रुत्तीने त्यांच्यावर जो विरोध केला तोच विरोध या स्वतंत्र भारतात संविधान असताना या टोकाचा विरोध होतो
  इतकच नाही तर हत्या होत आहेत विचार मारले जात आहेत
  केवढे हे दुर्दैव आणि दहशत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.