Press "Enter" to skip to content

कोरानामुळे गणेशमूर्तिकारांचा धंद्यात 50 कोटींचा फटका

  • सहज विसर्जन होण्यासाठी गणेश भक्तांची इंकोफ्रेंडली मुर्तीकडे धाव 🔷🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह / पेण ( राजेश कांबळे ) 💠✳️💠✳️

देशात कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे यावर्षी पेण तालुक्यातील गणेश मूर्तिकारांच्या धंद्यात सुमारे 50 कोटींचा नुकसान झाला आहे पेण तालुक्यातून सुमारे 150 कोटी रुपयांच्या गणेशमूर्ती दरवर्षी संपूर्ण देशासह विदेशातही पाठवण्यात येतात. परंतु या वर्षी कोरोनाच्या भीतीपोटी सुमारे 100 कोटींचा व्यवसाय झाल्याने गणेश उद्योगाला 50 कोटींचा फटका बसला आहे.

महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमधील व्यापारी पेण तालुक्यातून होलसेल मध्ये गणेश मुर्ती नेऊन त्यांची विक्री करतात परंतु या वर्षी मात्र कोरोनाच्या संकटामुळे अनेक ठिकाणी रेड झोन असल्याने व्यापाऱ्यांनी कमी प्रमाणात गणेश मूर्तींची खरेदी केली आहे. त्यामध्ये मुंबई,पुणे,नाशिक,नागपूर, नगर, ठाणे, डोंबिवली, कल्याण, संभाजीनगर यांंसह इतर शहरांमध्येे सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने तेथे मंडप टाकून गणेशमुर्ती विक्री करण्याकरिता परवानगी नसल्याने याचा परिणाम विक्रीवर झाला असल्याची माहिती गणेश मूर्ती व व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत देवधर यांनी दिली.

गणेशाच्या मुर्ती लंडन, ऑस्ट्रेलिया, थिवी, अमेरिका, दुबई, थायलंड, इंडोनेशिया, मॉरिशससह अनेक देशांना बाप्पाची वारी होते. पेण तालुक्यातून दरवर्षी सुमारे 1लाखाहुन अधिक गणेशमुर्त्या फॉरेनला जातात. लंडन,ऑस्ट्रेलियन, थिवी व अमेरिका येथे बाप्पाच्या मुर्त्या कंटेनर मधून समुद्रमार्ग जहाजाने पाठवण्यात येतात व या प्रवासाला 45 ते 50 दिवस लागतात. परंतु यावर्षी लॉक डाऊन मिळे या देशांना बाप्पा ची वारी होऊ शकली नाही. यावर्षी सुमारे 25 हजार गणेशमूर्तींचीच वारी फॉरेनला झाली आहे. परंतु सुमारे 70 ते 75 हजार गणेशमूर्तींची निर्यात न झाल्याने या व्यवसायाला दीड ते दोन कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

यासह रेल्वेबंद असल्याने 1 लाख गणेशमूर्ती कोकणात गेल्याच नाहीत.
मुंबईतील चाकरमानी उत्सवाकरिता कोकणात आपल्या घरी जाताना पेण येथून सुबक सुंदर बाप्पांच्या मूर्ती रेल्वेद्वारे घेऊन जाताात परंतु यावर्षी रेल्वे बंद असल्याने त्याच प्रमाणे गणेशभक्तांना 10 दिवस काॅरनटाइनचे आदेेश असल्याने हजारो गणेशभक्त कोकणात गेलेच नाहीत. त्यामुळे ही गणेशमूर्ती विक्रीवर परिणाम झाला आहे. अशी माहिती संघटनेचे उपखजिनदार निलेश समेळ यांनी दिली.

केंद्र शासनाच्या पीओपीच्या गणपतीमूर्ती वर घातलेल्या बंदीनंतर ग्राहकांनीही पीओपीच्या गणेशमूर्तींकडे पाठ फिरवली आहे. यानंतर केंद्र शासनाने पीओपीच्या गणेशमूर्तींना विक्रीकरिता हिरवा कंदील दाखवला असला तरी ग्राहकांनी मात्र शाडू मातीच्या लहान आकाराच्या गणेशमूर्तींना पसंती दिली आहे त्यामुळे एकट्या पेण तालुक्यात सुमारे 5 लाख पीओपीच्या गणेशमूर्ती विक्री विना कारखान्यांत पडून आहेत.

तर यावर्षी शाडू मातीच्या ईकोफ्रेंडली गणेशमूर्तीना भक्तांनी अधिक मागणी केली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी तयार असुन शाडू मातीच्या व नैसर्गिक रंगांपासुन तयार करण्यात आलेल्या गणेशमुर्तीना चांगलीच मागणी वाढली आहे. विसर्जना नंतर सदरच्या बाप्पाच्या मुर्ती पाण्यात सहजपणे विरघळून जातात पर्यावरणाला मारक ठरत नाही त्यामुळे गणेशभक्त ईकोफ्रेंडली गणेशमूर्तीना प्राधान्य देत असल्याने शाडू मातीच्या ईकोफ्रेंडली गणेशमूर्तींची मागणी जास्त वाढली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.