Press "Enter" to skip to content

“सारथी” चा वाद मिटला ! : उद्याच मिळणार ८ कोटी रुपये

सारथी बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाच मोठ्या घोषणा ###

सिटी बेल लाइव्ह / मुंबई ###

सारथी संस्थेबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा केली आहे. संभाजीराजेंनी केलेल्या प्रमुख मागण्या मान्य करत अजित पवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

सारथीबद्दलच्या या बैठकीत वेगवेगळ्या खात्यांचे अधिकारी देखील उपस्थित होते. कोरोनाचं संकट असताना सारथी काही बंद केली जाणार नाही. वेगवेगळ्या अफवा या दरम्यान आल्या. मात्र सारथीबाबत सरकारची अतिशय सकारात्मक भूमिका आहे. मी माझं सर्वस्व पणाला लावून या संस्थेसाठी काम करणार आहे,’ असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं

अजित पवारांच्या घोषणा

– सारथी संस्थेची स्वायत्तता टिकवणार

– सारथी संस्थेला उद्याच्या उद्या 8 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार, वडेट्टीवार यांचं खातं ती रक्कम देईल

– गेल्या सरकारने ही संस्था आणल्यानंतर काही प्रश्न निर्माण झाले. सीताराम कुंटे यांनी आपला अहवाल 14 दिवसात द्यायचा आहे

– मुख्यमंत्र्यांना विनंती करणार की सारथी नियोजन विभागाच्या अंतर्गत येणार…अण्णासाहेब पाटील महामंडळ नियोजन विभागात आणणार

– मराठा समाजातल्या गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्याचं आम्ही ठरवलं आहे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.