Press "Enter" to skip to content

‘लालपरी’ आजपासून जिल्ह्याबाहेर धावणार…

सिटी बेल लाइव्ह / मुंबई :

राज्य सरकारने राज्यातील बससेवा सुरु करण्यास हिरवा कंदील दाखवला असून उद्यापासून जिल्ह्यांतर्गत धावणारी बस जिल्ह्याबाहेरही धावणार आहे. असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.

मात्र, इतर खासगी वाहनांना प्रवासासाठी ई-पास बंधनकारक असणार आहे, आता तालुका ते गाव ते तालुका-जिल्हा सुरु असणारी एसटी जिल्ह्याच्या बाहेर धावणार आहे.

बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ई-पासची आवश्यकता नसणार आहे. त्यामुळे, जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
मात्र एका एस.टीत फक्त २२ प्रवासी नेण्यासाठी बंधन असल्याने बस संख्या वाढवणार आहेत .
गेल्या पाच महिन्यापासून आंतरजिल्हा एस.टी सेवा बंद होती . ही सेवा राज्यातील मुंबई, पालघर ,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, नाशिक, धुळे,जळगाव,अहमदनगर, पुणे, ,कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर औरंगाबाद बीड जालना लातुर ,नांदेड ,उस्मानाबाद, परभणी, नागपूर ,भंडारा, गडचिरोली,चंद्रपूर ,वर्धा, अकोला, अमरावती,यवतमाळ बुलढाणा विभागात चालु होत आहे.
दरम्यान, यासंदर्भात राज्य सरकारकडून मिशन बिगेन अगेन 6 अंतर्गत एक परिपत्रक जारी केलं आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.