Press "Enter" to skip to content

रोहयातील एम्‍प्‍ले केमिकल कंपनीविरोधात भाजपचा एल्‍गार

प्रवीण दरेकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली मोर्चा : कामगारांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा #

सिटी बेल लाइव्ह / रायगड: धम्मशिल सावंत #

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्‍यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमधील एम्‍प्‍ले केमिकल कंपनीच्‍या मनमानी कारभाराविरोधात आज भाजपच्‍या वतीने कंपनीच्‍या प्रवेशव्‍दारावर मोर्चा काढण्‍यात आला . या आंदोलनाचे नेतृत्‍व विधानपरीषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केले . दरेकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली शिष्‍टमंडळाने कंपनी व्‍यवस्‍थापनाची भेट घेवून कामगारांना भेडसावणाऱ्या समस्‍यांबाबत चर्चा केली .

यावेळी व्‍यवस्‍थापनाने सकारात्‍मक प्रतिसाद दिला असून कामगार कपात , नवीन भरती , कामगारांना मिळणारया सुविधा या मुद्यांवर पुढील चर्चेची तयारी दाखवली असल्‍याचे दरेकर यांनी सांगितले . यावेळी कंपनीतील नवीन युनियनच्‍या नामफलकाचे अनावरण दरेकर यांच्‍या हस्‍ते झाले .  भाजपचे आमदार प्रवीण दरेकर , जिल्‍हाध्‍यक्ष अॅड . महेश मोहिते यावेळी उपस्थित होते . कंपनी परीसराला पोलीस छावणीचे स्‍वरूप आले होते .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.