Press "Enter" to skip to content

एसटी महामंडळ लवकरच सुरू करणार पेट्रोल पंप !

सिटी बेल लाइव्ह / मुंबई #

एसटी महामंडळाने आपले उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या मोकळ्या जागांवर पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी इंडियन ऑईल कंपनीशी करार केला आहे.

या सामंजस्य करारानूसार राज्यात 30 ठिकाणांवर पेट्रोल, डिझेल इंधनांची विक्री करण्यात येणार आहे.

तर पाच ठिकाणांवर एल.एन.जी. इंधनाची सर्व सामान्यांसाठी विक्री केंद्रे सुरू होणार असल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली.

हे पंप इंडियन ऑईलकडून बांधण्यात येणार असून त्याचे संचलन एसटी महामंडळाकडून करण्यात येणार आहे.

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असलेल्या प्रवासी वाहतूकीतून मिळणाऱ्या उत्पन्नाला मुकावे लागत आहे.

अशा परिस्थितीमध्ये एसटीने पर्यायी उत्पन्नाचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.