Press "Enter" to skip to content

परिवहन महामंडळातील महिला चालकांना न्याय मिळवून देण्यासाठी निर्भायाचा पुढाकार

सिटी बेल लाइव्ह / खांब/रोहा (नंदकुमार मरवडे) :

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने संपूर्ण राज्यामध्ये मोठा गाजावाजा करीत राज्य परिवहन महामंडळात गतवर्षी  सन २०१९ मध्ये प्रथमच चालक कम वाहक या पदावर सरळ सेवा भरती अंतर्गत २१५, आदिवासी समाजातील २१ अशा २३६ महिलांची  चालक कम वाहन (ड्रायव्हर/कंडक्टर असे दुहेरी)पदावर महिलांची निवड करण्यात आली होती.

एस.टी.चे स्टेअरिंग महिलांच्या हाती देत आर्थिक  स्रोता च्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या कालावधीत  या चालक महिलांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू झाले. परंतु २२ मार्च २०२० पासून कोविड – १९ च्या टाळेबंदी ने महामारी च्या मंदी तील संधी चा पुरेपूर फायदा घेत नव नियुक्त महिला कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण कोणतीही पूर्व सूचना न देता अचानक खंडित करून त्यांना घरी बसविण्यात आलेले आहे.त्यामुळे हातातील जॉब गेल्याने या चालक /वाहक महीलांपुढे रोजगाराचा मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला असून उपासमारीची वेळ या शासनाने  आणली आहे.

प्रशिक्षणाकरिता बऱ्याच महिला चालक कम वाहन (ड्रायव्हर/कंडक्टर असे दुहेरी)पदा करिता प्रसंगी कर्ज सुद्धा काढून ट्रेनिंग घेतले होते.उर्वरित  प्रशिक्षण होईल की नाही तसेच आपल्या ला सेवेत सामावून घेतले जाईल की नाही या शंकेने या  चालक कम वाहन (ड्रायव्हर/कंडक्टर) असे दुहेरीपदा वरील महिला चिंतातुर झाल्या आहेत.प्रतिकूल परिस्थितीत जगणाऱ्या या महिला एका आगळ्या वेगळ्या क्षेत्रात झेप घेऊ इच्छित असताना अचानक त्यांच्यावर आभाळ कोसळले आहे. त्यांना  प्रशिक्षण कालावधीचे विद्यावेतन पण देण्यात आलेले नाही तसेच त्यांचा वाहनाचा परवाना पण अद्याप पर्यंत काढून देण्यात आले नसून घोर फसवणूक करणाऱ्या आली आहे.

महिला चालक कम वाहन (ड्रायव्हर/कंडक्टर) असे दुहेरी पदा करिता चे प्रशिक्षण (ट्रेनिंग) पूर्ण करून विद्यावेतन (स्टायपेंड) देऊन राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत समाविष्ट करून घ्यावे या महत्त्वपूर्ण मागणी साठी झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सनदशीर मार्गाने, लोकशाही चे आदर बाळगून महाराष्ट्र एस.टी.कामगार संघटनेच्या निर्भया समिती सदस्यांनी संदिप शिंदे,हनुमंत ताटे यांच्या मार्गदर्शन अंतर्गत राज्य महिला संघटक श्रीमती शिला नाईकवाडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन  महिला चालक कम वाहन (ड्रायव्हर/कंडक्टर असे दुहेरी)पदावरील महिलांना न्याय हक्क मिळवून देण्याचे अभियान हाती घेतले आहे.

या अभियाना अंतर्गत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,परिवहन मंत्री यांना E – mail इलेक्ट्रॉनिक माध्यमां द्वारे निवेदन पाठवून या अन्याय ग्रस्त महिलांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्याची विनंती केलेली आहे.
 तसेच  भारतीय  स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट च्या दिवसी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया ताई सुळे,शिवसेना आमदार निलम ताई गोऱ्हे यांना देखील योग्य त्या कारवाई करण्यासाठी निवेदन पाठवून अन्याय ग्रस्त महिलांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देणारा लढा अधिक प्रखर करण्यात येईल असे ही राज्य महिला संघटक श्रीमती शीला संजय नाईकवाडे,रायगड विभागीय अध्यक्ष श्री.विलास खोपडे , विभागीय सचिव श्री गणेश शेलार व केंद्रीय उपाध्यक्षा आणी रायगड निर्भया श्रीमती आशाताई घोलप यांनी सांगितले आहे.       
               

एसटी महामंडळात सन २०१९ मध्ये प्रथमच चालक कम वाहक या पदावर सरळ सेवा भरती अंतर्गत २१५ आदिवासी समाजातील २१ अशा २३६ महिलांची निवड करण्यात आली. महामंडळाने पहिल्यांदा चालक पदावर महिलांची नेमणूक करून बस चालविण्याची संधी महिलांना उपलब्ध करुन देऊन एक नवे अवकाश महिलांना खुले करुन दिले.  २३ ऑगस्ट २०१९ रोजी भारताच्या माजी राष्ट्रपती माननीय प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते बालगंधर्व नाट्य सभागृह पुणे येथे शानदार समारंभात या महिला चालकांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी तात्कालिन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी महिला चालकांना प्रशिक्षण काळात विद्यावेतन देण्यात येईल व त्यांना वाहन चालविण्याचा परवाना काढून देण्याची जबाबदारी प्रशासन घेईन अशी घोषणा ही केली होती.

प्रसारमाध्यमांनी या महिला चालकांच्या निवडीस मोठी प्रसिद्धी दिली होती व समाजातील सर्वच स्तरांतून या निर्णयाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत झाले होते परंतु त्यावेळचे शासन निर्णय आणि आताचे रा.प.महामंडळाच्या दुटप्पी भूमिकेमुळे सारेच संभ्रमात पडले आहेत..

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.