Press "Enter" to skip to content

…लवकरच मराठा क्रांती मोर्चा !

तांबडी-रोहा अत्याचाराला बळी पडलेल्या लेकीला न्याय मिळविण्यासाठी मराठा आक्रमक !

सिटी बेल लाइव्ह / धाटाव (शशिकांत मोरे) :

 महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून रोह्यातील तांबडी गावात मराठा लेकीला न्याय मिळावा यासाठी मराठा क्रांती मूक व ठोक मोर्चा मुख्य समन्वयक यांनी भेट घेतली. याप्रसंगी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी राजन घाग यांनी पत्रकार परिषद घेऊन ६० वा मोर्चा २६ सप्टेंबरला तांबडीतून निघेल असा इशारा राज्य सरकारला दिला होता. या पार्श्वभूमीवर सदर ग्रामस्थांसोबत झालेल्या बैठकीत समन्वयकांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी मोर्चा २६ सप्टेंबरला न काढता अधिवेशन काळातच म्हणजे ७ सप्टेंबर नंतर २-४ दिवसांतच काढला जाऊन अत्याचाराला बळी पडलेल्या अल्पवयीन मराठा लेकीला न्याय मिळावा यासाठी  सरकारवर दबाव निर्माण केला जावा अशी आग्रही मागणी केली. लवकरच मराठा क्रांती मोर्चाचे सर्व मुख्य पदाधिकारी बैठक घेऊन यासंबंधात निर्णय घेणार असल्याचे माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना श्री रुपेश मांजरेकर यांनी दिली. तसेच सदरचा मोर्चा हा मराठा क्रांती मोर्चांच्या प्रथेनुसार सर्व नियम पळून शांततेत काढला जाईल व यासाठी सर्व महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने मराठा समाज आपल्या लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी तांबडी-रोहा येथे येईल अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विवेक सावंत व महेश राणे यांनी दिली.

तांबडी गावात मराठा क्रांती मोर्चा समन्वयक राजनजी घाग, रमेश केरे पाटील, प्रफुल्ल पवार, रुपेश मांजरेकर, विवेक सावंत, विलास सुद्रीक, महेश राणे, युवराज सूर्यवंशी, महेश डोंगरे, उल्हास सूर्यवंशी, महेश यादव, प्रकाश कदम, भागवत पानसरे, आदी व सौ छाया इंदुलकर, सौ रुपाली निंबाळकर आणि इतर भगिनी असे अनेक समन्वयक पूर्ण महाराष्ट्र राज्यातून म्हांदळेकर कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी आले होते. यावेळी रोहा, नागोठणा येथील अनेक मराठा समन्वयकही उपस्थित होते.

 तांबडी-रोहा येथील मराठा लेकीला न्याय देण्यासाठी मराठा क्रांती मूक व ठोक मोर्चा एकत्र

महाराष्ट्राच्या सोलापूर, पुणे, संभाजीनगर, वसई, मुंबई, ठाणे, रायगड, नगर अशा विविध जिल्ह्यातून मराठा क्रांती मोर्चातील महत्वाचे राज्य समन्वयक तांबडी-रोहा येथे पोहोचले. नराधमांच्या क्रौर्याला बळी पडलेल्या अल्पवयीन मराठा लेकीला न्याय देण्यासाठी मराठा क्रांती ठोक व मूक मोर्चा समन्वयक सदर मराठा म्हांदळेकर कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी तांबडी गावात पोहोचले.

याआधी रक्षाबंधनाच्या दिवशी आपले घरचे रक्षाबंधन सोडून यापैकी काही समन्वयक आपल्या मराठा बहिणीसाठी, तिला न्याय मिळावा यासाठी धावून गेले होते. त्यावेळी रोहा पोलीस स्टेशनला निवेदनही देण्यात आले होते.

मराठा क्रांती मोर्चा मुख्य समन्वयक श्री राजन जी घाग व इतर सहकारी यांनी सदरच्या घटनेचे मूळ तपास अधिकारी सूर्यवंशी यांनी पुनर्नियुक्ती करावी, सदरचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालावे व सरकारी अभिवक्ता म्हणून उज्ज्वल निकम यांनी नियुक्ती करावी अशी मागणी मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांजकडे केली होती. सबब संबंधित पोलीस ठाण्याला भेट देऊन सर्व मराठा समन्वयकांनी तपासातील प्रगतीही जाणून घेतली.

तांबडी गावात मराठा क्रांती मोर्चा समन्वयक राजनजी घाग, रमेश केरे पाटील, प्रफुल्ल पवार, रुपेश मांजरेकर, विवेक सावंत, विलास सुद्रीक, महेश राणे, युवराज सूर्यवंशी, महेश डोंगरे, उल्हास सूर्यवंशी, महेश यादव, श्री प्रकाश कदम, भागवत पानसरे, आदी व सौ छाया इंदुलकर, सौ रुपाली निंबाळकर आणि इतर भगिनी असे अनेक समन्वयक पूर्ण महाराष्ट्र राज्यातून म्हांदळेकर कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी पोहोचले. यावेळी तांबडी गावच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थ, रोहा, नागोठणा येथील अनेक मराठा समन्वयकही उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.