Press "Enter" to skip to content

दसबा फाऊण्डेशनच्या वतीने निबंध स्पर्धा संपन्न


खा.सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन ###


सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे) ###


कोकणचे भाग्यविधाते तथा रायगडचे लोकप्रिय खा.सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दसबा फाऊण्डेशन किल्ला,रोहे यांच्या वतीने आँनलाईन निबंध स्पर्धा संपन्न करण्यात आल्या.
सामाजिक जनजागृतीच्या दृष्टीने दसबा फाऊण्डेशन यांच्या वतीने गेल्या काही वर्षापासून सामाजिक,शैक्षणिक व अन्य क्षेत्रात विविधांगी उपक्रम राबवून जनजागृतीचे कार्य केले जात आहे. तर दसबा फाऊण्डेशनचे अध्यक्ष महेश बामुगडे,उपाध्यक्ष प्रकाश साळुंके तसेच अन्य पदाधिकारी यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेली ही स्पर्धा शालेय,महाविद्यालयीन व खुल्या गटासाठी घेण्यात आली व स्पर्धेस स्पर्धकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला.या स्पर्धेत शालेय गट ( इ.१० वी ते १२ वी) प्रथम क्र.श्रुती नंदकुमार मरवडे, तळवली तर्फे अष्टमी, द्वितीय क्र.श्रुती प्रकाश शिंदे,वरसगाव व तुतीय क्र.श्रेया प्रशांत म्हसकर पुगाव यांनी तर महाविद्यालयीन गटात प्रथम क्र.संकेश रमेश पाटील रोहा,द्वितीय क्र.क्रुष्णाली दत्ताराम घरट नागोठणे तर तुतीय क्र.पायल रणजित बामुगडे किल्ला तसेच खुल्या गटात प्रथम क्र.पांडुरंग हरि खोतकर कोलाड,द्वितीय क्र.गणेश नरहरि पती भुवनेश्वर व तुतीय क्र.प्रियेशा प्रमोद गिजे वर्धमान रेसिडेन्सी भुवनेश्वर यांनी पटकावले आहेत.विजेत्या स्पर्धकांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कमेची पारितोषिकं देऊन गौरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.तर सहभागी स्पर्धाकांनाही सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी स्पर्धा संयोजन समिती रूपेश बामुगडे,दिनेश दिघे,प्रतिक कचरे,,गणेश बामुगडे, दर्शना साळवी,रोहित माळी,अनंत चव्हाण,दत्ता बामुगडे, प्रयाग बामुगडे यांनी मोलाचे सहकार्य केले. तर स्पर्धा परीक्षण नंदकुमार मरवडे व दर्शना साळवी यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.