स्वातंत्र्यदिनावर कोरोनाचे सावट
सिटी बेल लाइव्ह / कर्जत – ( विजय मांडे )
स्वातंत्र्याच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त कर्जत तालुक्यात साधेपणाने ध्वजसरोहण समारंभ साजरे करण्यात आला.
कोरोनाचे सावट असल्याने उपस्थितांनी तोंडाला मास्क व सोशल डिस्टनसिंगचे काटेकोर पालन केले. दरवर्षी होणारे विविध कार्यक्रम बहुतांश ठिकाणी रद्द करण्यात आले. यंदा पहिल्यांदाच विद्यार्थ्यां शिवाय शाळां, महाविद्यालयांमधील ध्वजारोहण समारंभ झाले. नगरपरिषद व कोंकण ज्ञानपीठ फार्मसी महाविद्यालयाने सर्वांनी या कार्यक्रमाचा घरबसल्या आंनद मिळावा म्हणून फेसबुक व सोशल मीडियाच्या माध्यमाचा वापर केला होता.
ध्वजारोहण कार्यक्रमात पंचायत समिती कार्यालयात सभापती सुजाता मनवे, नगरपरिषदे मध्ये नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, तहसील कार्यालयात तहसीलदार विक्रम देशमुख, उपविभागीय कार्यालयात उपविभागीय अधिकारी वैशाली परदेशी – ठाकूर, पोलीस ठाण्यात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात पोलीस निरीक्षक अरुण भोर, कर्जत दिवाणी न्यायालयात न्यायाधीश श्रद्धा डोलरे, सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत कार्यालयामध्ये उपअभियंता अजयकुमार सर्वगोड, कोंकण ज्ञानपीठ कर्जत महाविद्यालयात प्रभारी प्र. प्राचार्य रवींद्र कटके, अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. मधुकर लेंगरे, फार्मसी महाविद्यालयात प्रा. प्रीतम जुवाटकर, गीता घारे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये राजीपचे उपाध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष सुधाकर घारे, अभिनव ज्ञान मंदिर प्रशालेत खजिनदार विनायक चितळे, जीवन शिक्षण मंदिर मराठी मुलांच्या शाळेत उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, विद्या विकास मंदिर मध्ये मुख्यध्यापिका मीना प्रभावळकर, शेतकरी खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात शरद लाड, आंबे भवानी माध्यमिक विद्यालय आणि भिसेगाव मराठी शाळेत माजी पंचायत समिती सदस्य पुंडलिक भोईर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी आमदार महेंद्र थोरवे, मुख्याधिकारी पंकज पाटील, माजी नगराध्यक्ष वनिता म्हसे, रजनी गायकवाड, आदींसह नगरसेवक, नगरसेविका, शिक्षक व नागरिक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम सोशल डिस्टनसिंगचे काटेकोर पालन करून करण्यात आला.
Be First to Comment