Press "Enter" to skip to content

गँगस्टर विकास दुबे च्या मुसक्या आवळल्या : मध्यप्रदेशातील उज्जैन मध्ये अटक

सिटी बेल लाइव्ह / उज्जैन ####

उत्तर प्रदेशातील कानपूर येथे आठ पोलिसांची हत्या करून संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या गँगस्टर विकास दुबे हा अखेर पोलिसांच्या हाताला लागला. कुख्यात गँगस्टर विकास दुबे याला मध्य प्रदेशात उज्जैनमध्ये अटक करण्यात आलीय. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, विकास दुबे उज्जैनमधील महाकाल मंदिरात दर्शनासाठी आला होता. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली. मंदिरातील सिक्युरिटी गार्डने त्याला ओळखल्यानंतर त्याने पोलिसांना खबर दिली त्यानंतर स्थानिक पोलिसांनी त्याला अटक केली.


3 जुलै रोजी कानपूरमध्ये पोलिस आणि गँगस्टर विकास दुबेच्या टोळीत चकमक झाली या चकमकीत उत्तर प्रदेशचे आठ पोलिस हुतात्मा झाले.
3 जुलैनंतर विकास दुबे फरार झाला. त्यानंतर देशभरात विकास दुबेच्या टोळीची धरपकड करण्यात आली.
9 जुलै रोजी पहाटे दुबेचे दोन साथीदारांना एन्काउंटरमध्ये ठार झाले.
9 जुलै रोजी सकाळी विकास दुबे उज्जैनमध्ये दाखल झाला.
उज्जैनमधील महाकाल मंदिरात दर्शनासाठी तो गेला होता. यावेळी विकास दुबे ला
मंदिरातील सिक्युरिटी गार्डने ओळखले आणि त्याने खबर दिल्यानंतर स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेऊन केली अटक.

दरम्यान विकास दुबे हा पोलिसांची हत्या केल्यानंतर दोन दिवस उत्तर प्रदेशात होता त्यानंतर त्याने तेथून पळ काढला आणि मध्य प्रदेशात आला. उत्तर प्रदेश पोलिसांना मात्र तो सापडला नाही आणि आज मध्यप्रदेशात उज्जैन मधील गर्दीचे ठिकाण असलेल्या मंदिरात तो खुलेआम गेला. तेथे तोआरडाओरड करू लागला यावरून त्याने स्वतःच आत्मसमर्पण करण्याचा प्लॅन तर आखला नव्हता ? त्याचा एन्काऊंटर होऊ नये त्यासाठीच केलेली ही खेळी तर नव्हे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.