सिटी बेल लाइव्ह / मुंबई #
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच मुंबईसह महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून मागील 24 तासांत जोरदार पाऊस झाला. यात मुंबई-70-100 मिमी, ठाणे-नवी मुंबईत 100-120 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अपडेट्सनुसार, येत्या 24-48 तासांत मुंबईसह , ठाणे , पालघर , रायगडसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पावसाचा हा जोर पुढील 2-3 दिवस कायम राहणार असल्याचे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी सांगितले आहे.
Be First to Comment