Press "Enter" to skip to content

आंतरजिल्हा एसटी बससेवा आणि कोचिंग क्लासेस सुरु करणार

पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

सिटी बेल लाइव्ह / चंद्रपूर #

राज्यात आंतरजिल्हा एस. टी. बस सेवा कोविड नियम पाळून सुरू करणार असल्याची घोषणा मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुरात केली आहे. कोरोना संकट वाढत असले तरी एका एसटी बस मध्ये 20 पेक्षा अधिक प्रवासी नेऊ न देता ही सेवा सुरू करण्याचा मानस सरकारने व्यक्त केला आहे. सोबतच राज्यातील कोचिंग क्लासेस आणि स्पर्धा परीक्षा केंद्र कोरोना नियम पाळून प्रारंभ करण्याची तयारी सरकारने दाखवली आहे.

वडेट्टीवार यांनी ऐन संकट काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सेवा सोडणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. प्रसंगी मेस्मा लावला जाणार आहे. चंद्रपूर शासकिय वैद्यकीय महाविद्यालयातील 5 डॉक्टरांना याचसाठी नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.