Press "Enter" to skip to content

भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावरील हल्ल्याचा माथेरान मधून जाहीर निषेध 

सिटी बेल लाइव्ह / मुकुंद रांजाणे ###

डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी बांधलेले घर म्हणून राजगृहाची ओळख संपुर्ण जगाला आहे.हा हल्ला हा केवळ वास्तुवरील हल्ला नसून तो ज्ञानभांडावरील हल्ला आहे असे आम्ही मानतो.असा हल्ला विकृत मानसिकतेचेच द्योतक आहे.अशा विकृत मानसिकतेचा भारतीय बौद्ध महासभा व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहर शाखा माथेरान,यानी तीव्र शब्दात जाहिर निषेध करून व या हल्ल्यातील विकृत हल्लेखोरांचा महाराष्ट्र शासनाने गांर्भीयाने शोध घेऊन आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करावी.व आरोपींच्या सदर विकृत कृती मागील मेंदुचा शोध घेऊन,अशा विकृतीला कठोर शिक्षा करावी.अशा मागणीचे निवेदन पोलीस ठाण्यात आरपीआय शाखा माथेरान आणि भारतीय बौद्ध सभा यांनी सादर केले आहे
बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृहावरील हल्ला हा फुले – शाहू – आंबेडकरांच्या विचारधारेवरचा हल्ला आहे असे आम्ही मानतो.व या विकृत व भ्याड हल्ल्याचा आणि हल्लेखोरांचा जाहिर निषेध करतो.असेही या निवेदनात म्हटले आहे. यावेळी आरपीआय अध्यक्ष अनिल गायकवाड, भारतीय बौद्ध सभा अध्यक्ष किशोर सोनावले, संतोष शिंदे पांडुरंग सोनावले, रुपेश गायकवाड आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.