Press "Enter" to skip to content

नेरुळगाव येथील सफाई कामगारांना सेनेटायझर व मास्क चे वाटप

महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृती दिनानिमित्त लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई व संस्थापक अध्यक्ष विरेंद्र (गुरु) म्हात्रे यांच्या तर्फे वाटप ###


सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर) ###

जेष्ठ निरोपनकार महाराष्ट्र भूषण डॉ. श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृती दिनानिमित्त लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई व संस्थापाक अध्यक्ष विरेंद्र ( गुरु )म्हात्रे यांच्या तर्फे नेरुळगाव येथील सफाई कामगारांना सेनेटायझर व मास्कचे वाटप बुधवारी करण्यात येणार आले.
       या वाटपाच्या कार्यक्रमासाठी विशेष मान्यवर म्हणून सिनेअभिनेत्री नयना पवार तसेच वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विरेंद्र लांगाडे, जयश्री फाउंडेशन अध्यक्ष वैभव जाधव व क्षितिज पर्वचे संपादक सनिप कलोते, नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष महेश भनगे, नवी मुंबई राष्ट्रवादी मच्छीमार चे अध्यक्ष  राहुल म्हात्रे  इत्यादी मान्यवर बरोबर लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई उपाध्यक्ष अक्षय पाचारने, खजिनदार  रोशन पाटील, उपखजिनदार शुभम सांळूखे, सचिव सचिन जाधव,उमेश टोके व  ईतर सदस्य उपस्थित होते.
       

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.