Press "Enter" to skip to content

शेतकरी कामगार पक्षाचा “एक हात मदतीचा”

अलिबाग तालुक्यातील ५०,००० निराधार लोकांना खिचडीचे वाटप ###

सिटी बेल लाइव्ह / अलीबाग ###


सध्या कोरोनाच्या सावटाखाली सारे जग वावरत आहे. कोविड – 19 साथीचा रोग आणि निसर्ग चक्रीवादळा मुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे, हे सर्व पूर्वपदावर आणण्यासाठी या आपत्तीच्या काळात शेतकरी कामगार पक्ष व चित्रलेखाताई पाटील नागरिकांच्या मदतीसाठीपुन्हा एकदा धावून आले आहेत.
लॉकडाऊनमुळे अनेकांच्या जेवणाचे हाल होत आहेत. गावोगावी आदिवासी बांधव व भगिनी यांची तर दयनीय अवस्था आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आमदार जयंतभाई पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन अलिबाग तालुक्यातील ५०,००० निराधार लोकांना खिचडीचे वाटप करण्यात आले.
तसेच फक्त वाटप करण्यापुरते मर्यादित न राहता रायगड जिल्हा परिषद चे समाजकल्याण सभापती दिलीप भोईर उर्फ छोटमशेठ यांनी स्वतः आदिवासी बांधवांसोबत खिचडीचा आस्वाद घेतला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.