Press "Enter" to skip to content

युवक काँग्रेसच्या आंदोलनाला भाजप युवा मोर्चाचे जोरदार प्रत्युत्तर

राज्य सरकारचे अपयश झाकण्यासाठी कॉंग्रेसकडून दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न

युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचे अज्ञान आम्ही दूर करू -भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील

सिटी बेल लाइव्ह / मुंबई #

देशातील नरेंद्र मोदी सरकार विरोधात आज राज्यभरात युवक काँग्रेसने केलेल्या आंदोलनाला भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाने जोरदार प्रत्युत्तर दिले भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मुंबई येथील प्रदेश कार्यालयात बाहेर जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी भाजपा मुंबई प्रदेशाध्यक्ष मंगलप्रभात लोढा, खा.गोपाळ शेट्टी, खा. मनोज कोटक, आ. प्रसाद लाड, आ. राम कदम, भाजपा प्रवक्ते केशव उपाध्याय उपस्थित होते.

कोरोनाच्या संकटात देशासाठी वीस लाख करोडच्या पॉकेजची घोषणा भारताचे लोकप्रिय पंतप्रधान
माननीय नरेंद्रजी मोदी यांनी केली आहे. त्याविषयी कोणत्याही अभ्यास न करता,माहितीशिवाय कोरोनाचे संकट
असताना, राज्य सरकारचे अपयश झाकण्यासाठी, आंदोलन करण्याचा एक बालबोध प्रयत्न युवक कॉग्रेसने केला,
असा आरोप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केला आहे. तसेच युवक कॉग्रेसच्या कार्यकर्त्याचे अज्ञान दूर करण्याचे काम भारतीय जनता युवा मोर्चा करेल, असंही विक्रांत पाटील महणाले. “वीस लाख करोड, है विविध
योजनांच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारतासाठी खर्च केले जाणार आहेत. महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री व
विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी ‘आत्मनिर्भर महाराष्ट्र, आत्मनिर्भर भारत’ या पुस्तकातून केली आहे. या पुस्तकाच्या प्रति भाजयुमो तर्फे युवक कोंग्रेस च्या कार्यकर्त्यांना देन्यात येनार होत्या पण भाजयुमो चे कार्यकर्ते आपल्याला उत्तर देण्यास तयार असल्याचे बघुन आपला राज्य सरकारचे अपयश झाकण्यासाठी कोंग्रेसकडून दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न फसतो असे लक्षात येताच युवक कोंग्रेस चे कोणीही भाजपा कार्यलयाकडे फिरकले सुद्धा नाही.

महाराष्ट्रभर सर्वसामान्य, भोळ्याभाबड़या लोकांना , वीस लाख करोड पैकी किती पैसे मिळाले ? , कहा गए बीस लाख करोड ? असे महणत दिशाभूल करण्याचे कार्यक्रम युवक कॉग्रेसच्या वतीने सुरु आहेत. कदाचित त्यांच्या पक्षातून झालेल्या संस्कारातून त्यांना ‘पैसे मिळाले का?’ , ‘पैसे आले का ?’,असेच प्रश्न विचारण्याची सवय असावी, असंही पाटील म्हणाले. पुढे त्यांनी माहिती दिली की, कॉग्रेसचेच कार्यकर्ते कॉग्रेसच्या कार्यकर्त्याना असे प्रश्न विचारतात आणि त्यावर दिशाभूल करणारी उत्तरे देत व्हिडिओ शूट करुन सोशल मिडीयावर टाकत आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाने यांची पोलखोल यापूर्वीच केली आहे.

देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी लिहिलेल्या पुस्तकाचे वाचन करून कॉग्रेस कार्यकर्त्याचे अज्ञान दूर होऊ शकेल. राहुल गांधीना आदर्श मानणार्‍या युवक कॉंसच्या कार्यकर्त्यांना आकडेवारी आणि हिशोब समजेल, अशी आम्ही आशा व्यक्त करतो, असे म्हणून विक्रांत पाटील यांनी केंद्राने केलेल्या मदतीची आकडेवारी मांडली.

ते महणाले की, केंद्र सरकारने महाराष्ट्राला २८ हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची थेट मदत केली आहे. तसेच
भविष्यातही मदत, गुंतवणूक केली जाणार आहे.

थोडक्यात तपशीलवार माहिती पुढीलप्रमाणे :

१)रेशनिंग व्यवस्थेमार्फत ४ हजार ५९२ कोटींची मदत
तीन महिन्यांसाठी केंद्र सरकारने १७५० कोटींचा गहू , २,६२० कोटींचा तांदुळ व १०० कोटींची डाळ
तसेच स्थलांतरित मजुरांसाठी १२२ कोटींचे अन्नधान्य राज्याला दिले आहे.

2)आर्थिक दुर्बल नागरिकांच्या बँक खात्यात ३,८०० कोटी
गरीब महिलांच्या खात्यात १,३०८ कोटी
विधवा, परितक्त्या, दिव्यांग, जेष्ठ नागरिक यांना सानुग्रह अनुदान प्रत्येकी १००० रुपये असे ११६ कोटी

3)महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत प्रतिदिन मजुरी रु. १८२ वरून रु.२०२

४) कर्मचारी भविष्य निधी (EPF) मधून ७५% रक्‍कम अग्रिम (Advanced) उचलण्याची सोय
पुठील सहा महिने PF मधील कर्मचारी व उद्योगांचा हिस्सा सहा महिने सरकार भरणार

५)महाराष्ट्रातील ७३, १६,००० महिलांच्या मोफत गैस सिलेंडर साठी ६२५ कोटी खर्च (उज्वला योजनेच्या माध्यमातून)

६) स्थलांतरित मजुरांसाठी जवळपास २००० कोटींची मदत (राज्य आपदा निधीतील केंद्राचे ७७ % योगदान,
मजुरांसाठी रेल्वे)

७) शेतमाल खरेदीसाठी ९ हजार कोटींपेक्षा अधिकचे सहाय्य

८) करातील ४,५०० कोटी रक्कम आगाऊ राज्य सरकारला देण्यात आली

९) महाराष्ट्रातील शेतीक्षेत्रासाठी केंद्राकडून १५ हजार कोटींची गुंतवणूक
मार्च-एप्रिल या दोन महिन्यात ६३ लाख शेतकर्‍यांना ८६,६०० कोटींची कृषीकर्जे मंजूर, २५ लाख किसान क्रेडीट कार्ड ला मंजुरी

१०) मुद्रा योजनेअंतर्गत 2 टक्के व्याजमाफी

११) बचत गटांना १० लाखांऐवजी २० लाख रुपये तारणाशिवाय कर्ज

१२) वीजवितरण कंपन्यांना ९० हजार कोटींचा निधी (महावितरणला मिळू शकतात किमान ९ हजार कोटी )

“केंद्र सरकारच्या वतीने निधी आला आहे तसेच विविध योजनांच्या माध्यमातून मदत, गुंतवणूक स्वरूपात येणार
आहे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी राज्याच्या सरकारने सकारात्मक पवित्रा घ्यावा. युवक कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यॉनी हा
निरोप आपल्या पक्षश्रेष्टीना द्यावा “, असा सल्ला विक्रांत पाटील यांनी युवक कॉँग्रेसला दिला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.