Press "Enter" to skip to content

अमेरीकेतील महिला बौद्ध भन्ते ध्यानसाधनेत रमल्या सुधागडातील लेण्यात!

भारतातील प्राचीन बौद्ध लेण्यांचा अभ्यास व ध्यान-धारणा करण्यासाठी विराट जंगलातील लेण्यात भयमुक्त एकांत रहिवास

अमेरिकेतील महिला भंते वेन सुका यांचा सुधागड तालुक्यात मुक्काम

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)

भारतातील महत्वपूर्ण व प्राचीन बौद्ध लेण्यांना भेट देऊन त्यांचा अभ्यास व ध्यानधारणा करण्यासाठी अमेरिकेतील महिला बौद्ध भंते वेन सुका आल्या आहेत. सर्वप्रथम भन्ते सुका यांनी सुधागड तालुक्यातील गोमाशी येथील बौद्ध लेण्यांना भेट दिली. त्यानंतर नेणवली बौद्धलेणी येथे मुक्कामी आल्या असून महिनाभर त्या येथेच अभ्यास व ध्यानधारणा करणार आहेत.विराट जंगलातील लेण्यात त्या भयमुक्त एकांत रहिवास करीत आहेत.

अमेरीकेतील महिला बौद्ध भन्ते ध्यानसाधनेत सुधागडातील लेण्यात रमल्या आहेत. महिला बौद्ध भन्ते यांना पाहण्यासाठी व जागतिक बौद्ध धम्म जाणून घेण्यासाठी सुधागड सह जिल्ह्यातील बौद्ध बांधव, अभ्यासक त्यांची भेट घेऊन चर्चा करीत आहेत.
अमेरिकेतील भंते वेन सुका या 7 ते 8 महिन्यांपूर्वी भारतात दाखल झाल्या आहेत. जवळ फक्त एक मोबाईल थोडे पैसे आणि वापरण्यासाठी काही कपडे एवढे समान घेऊन त्या दुर्गम आणि जंगलात वसलेल्या लेण्यांमध्ये एकट्या वास्तव करत आहेत. फळे किंवा खीर असे पदार्थ कोणी दिल्यास त्या ग्रहण करतात. सध्या त्या राहत असलेल्या सुधागड तालुक्यातील नेणवली लेण्या खूपच दुर्गम आणि जंगलात वसलेल्या आहेत. येथे बिबट्या सारख्या हिंस्त्र प्राण्यांचे देखील वास्तव्य आहे. मात्र या सगळ्याची भीती वाटत नसल्याचे भंते वेन सुका यांनी सांगितले. महिन्यानंतर त्या सुधागडातील ठाणाळे येथील बौद्ध लेण्यांना भेट देणार आहेत.

सुधागड तालुका बौद्धजन पंचायत च्या पदाधिकाऱ्यांनी भंते वेन सुका यांची नुकतीच भेट घेऊन संवाद साधला व त्यांना काही फळे दिली. बौद्धजन पंचायतचे मोरेश्वर कांबळे, राजेश जाधव, नरेश शिंदे, दिपक शिंदे, रोहीणी जाधव, नुतन शिंदे, मनिषा कांबळे, विठ्ठल बैकर, सुजल बैकर, निशांत कांबळे, सौरभ मोते, अनिश कांबळे, शुभम शिंंदे आदी पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.