Press "Enter" to skip to content

धनंजय मुंडे यांच्याकडून महाविद्यालयासाठी १२ कोटी ७९ लाख रुपये निधीस मंजुरी

पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आनंदराज आंबेडकर  यांच्या मागणीला यश !

सिटी बेल लाइव्ह / मुंबई (धम्मशिल सावंत)

मुंबई येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय  ग्रंथालय बांधकाम,सोयी सुविधा, वाणिज्य व विधी महाविद्यालयाची दुरूस्ती. तसेच महाड येथील सुभेदार संवादकर वसतिगृह बांधकाम  करण्यासाठी एकूण १२ कोटी ७९ लाख ७४ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आली. तसेच त्या अनुषंगाने जी.आर देखिल काढण्यात आला.

ना.धनंजय मुंडे यांच्या दालनात सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. 

मुंबई येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयास ग्रंथालय बांधकाम, ग्रंथालयातील सोयी सुविधा, वाणिज्य व विधी महाविद्यालयाची दुरुस्ती व आदि कामे  प्रलंबित कामांना मंजूरी देण्यात यावी अशा मागणी सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी लावून धरली होती. या सर्व कामाचा पाठपुरावा करण्यासाठी कामगार नेते रमेश मा.जाधव यांना  आदेश दिले होते. हे प्रस्ताव भेटत नसल्यामुळे अनेक वेळा रिपब्लिकन सेना स्टाइल दाखवावी लागली. पण ही मागणी आनंदराज आंबेडकर यांनी तडीस नेण्याच्या उद्देशाने सातत्याने  लाऊन धरली होती. यासाठी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे संपुर्ण युनिट महाराष्ट्रभर अनेक दिवसांपासून आंदोलने करीत होती . या आंदोलनाची फलश्रुती होत मागण्यांना यश प्राप्त झाले असल्याचे कामगार नेते रमेश जाधव यांनी सांगितले.

   सामाजिक न्याय विभागाने औरंगाबादचा एक प्रस्ताव प्रलंबीत ठेवून प्रस्तावांपैकी मुंबईतील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाच्या ग्रंथालय बांधकामासाठी ४ कोटी ९४ लाख ३६ हजार ७०० रुपये, पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय व विधी महाविद्यालय या इमारतीच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ९९ लाख ७१ हजार ८७२ रुपये, तसेच सिद्धार्थ महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ४ कोटी ४९ लाख २५ हजार रुपये आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाड जि. रायगड येथे सुभेदार सवादकर वसतिगृह बांधकामासाठी १ कोटी ३६ लाख ४० हजार ६०३ रुपये इतकी रक्कम मजूर झाली.

एकुण चार कामांसाठी निधी १२ कोटी ७९ लाख ७४ हजार १७५ रुपये इतक्या निधीला मंजुरी देउन शासन निर्णय जी. आर.देखील काढण्यात आला आहे.त्यामुळे आंबेडकरी बहुजन समाजातून समाधान व्यक्त करण्यात आहे. दरम्यान  औरंगाबादचा प्रस्ताव प्रलंबित आहे. तोही लवकरात लवकर निकाली काढावा. अशी मागणी आता रिपब्लिकन सेनेमार्फत करण्यात आली आहे.

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी मोठी निधी मंजूर करून घेतली चेअरमन आनंदराज आंबेडकर असल्यामुळे हे शक्य झाले. अनेक राजकारणी उर बडवत आहेत. त्यांनी या आधीही सत्तेत होते.मग एवढी मोठी निधी का कॉलेजला आणली नाही. हे काम फक्त आणि फक्त चेअरमन आनंदराज आंबेडकर साहेबांनी शक्य करून दाखवले.  

विजय गोरे, मुंबई प्रदेश महासचिव रिपब्लिकन सेना

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.