सिटी बेल लाइव्ह / इंदुर #
प्रख्यात उर्दू कवी, लोकप्रिय शायर आणि गीतकार राहत इंदौरी यांचे निधन झाले आहे. ते 70 वर्षांचे होते. इंदौरी यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती होती. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
इंदुरमधील लोकप्रिय शायर आणि गीतकार राहत इंदौरी यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. खुद्द राहत इंदौरी यांनी काल सकाळी स्वत: ट्वीट करून माहिती दिली होती. त्यांचे हे ट्वीट आता अखेरचे ठरले आहे.
‘अचानक लक्षणे जाणवू लागल्यामुळे सोमवारी रुग्णालयात जाऊन कोरोनाची चाचणी केली होती. त्यांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे
ऑरबिंदो हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते.
इंदौरी म्हणाले होते, ‘मी आता हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे, माझ्यासाठी नक्की प्रार्थना करा. पण एक विनंती आहे की, माझ्या घरी फोन करू नका, माझ्या तब्येतीबद्दल मी ट्वीटर आणि फेसबुकवर याची माहिती देत राहिल’ असं भावनिक आवाहनही त्यांनी केलं होतं. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
Be First to Comment